पहिल्या अग्निपरिक्षेत शिंदे गट पास, शिवसेनेचा व्हीप झुगारला
मुंबई: शिंदे गट आज झालेल्या पहिल्या अग्निपरिक्षेत पास झाला विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर भारतीय जनता पार्टी चे राहुल नार्वेकर यांची निवड झाली, महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा त्यांनी पराभव केला, शिवसेनेला हा आणखी एक धक्का बसला आहे, सेनेने व्हीप जारी केला होता मात्र तरीही सरशी शिंदे गटाचीच झाली, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळले, त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली, या पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदे गटाच्या वतीने राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी ने शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांची उमेदवारी जाहीर केली,आजपासून विधिमंडळ अधिवेशनास प्रारंभ झाला, उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली, उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रयोद बदलला सुनील प्रभू यांची निवड करण्यात येऊन त्यांनी बंडखोर आमदार तसेच शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला होता, यावर एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही असा दावा केला होता, मतदान प्रक्रियेला प्रारंभ होताना सदस्य मोजणीच्या वेळी थोडा गोंधळ उडाला, शीर गणती करण्यात येऊन मतमोजणी करण्यात आली, राहुल नार्वेकर यांना 164 तर राजन साळवी यांना 1 07 मते मिळाली, समाजवादी पार्टीचे अबू आझमी ,रईस शेख, शाह फारूक अन्वर, हे तटस्थ राहिले,
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…