नाशिक: शहरातील गंगापूर रोडने ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनात ऑक्सिजनचा स्फोट झाला, यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे, शांतिनिकेतन सोसायटी परिसरात ही घटना घडली, हा स्फोट इतका मोठा होता की परिसरातील घरांच्या काचा फुटल्या, तर एका स्कोडा गाडीचेही नुकसान झाले,, घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी पोचली आहे.