मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
नाशिक :
नाशिक शहरातील हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. ही आग एवढी मोठी होती की त्यात ११ पेक्षा अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 38 प्रवाशी जखमी झाले आहेत. पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. त्यात बसचालकाचाही मृत्यू झाला.
नाशिक बस अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले.तसेच बस अपघातातील मृतांच्या वारसांना सरकारकडून पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचप्रमाणे जखमीवरील उपचाराचा खर्च ही सरकारकडून करण्यात येणार आहे. सिव्हिल रूग्णालयासह खासगी रूग्णालयात ही जखमीवर उपचार करण्यात येणार आहे.