नाशिक सीबीएसचेही होणार नूतनीकरण

नाशिक सीबीएसचे ही होणार नूतनीकरण
पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधी

आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे कामे शासनस्तरावर पाठपुरावा करून पूर्णत्वास नेण्याचे काम आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून अविरत सुरू आहे. नाशिक येथील सीबीएस हेदेखील नाशिक शहरातील बहुप्रतीक्षित काम होते. गेले अनेक वर्षांपासून नाशिक सीबीएस निधीच्या प्रतीक्षेत होते. आमदार
देवयानी फरांदे यांनी सदर बाबीकडे लक्ष देऊन सीबीएस बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे.
सीबीएस येथील जुनी इमारत पाडून नवीन इमारत व आगार उभी राहणार आहे यासाठी दोन मजली इमारत उभी राहणार असून तळमजल्यावर ९५० चौरस मीटरचे काम होणार आहे तर पहिल्या मजल्यावर ५९० चौरस मीटरचे काम होणार आहे. नवीन इमारत व आगारासाठी सांडपाण्याची व्यवस्थादेखील नव्याने करण्यात येणार आहे. सीबीएस परिसरातील ४४०० चौरस मीटर क्षेत्राचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून पेपर ब्लॉकदेखील लावण्यात येणार आहे. फायर फायटिंगमध्ये
व रेन हार्वेस्टिंग यासारख्या अत्याधुनिक सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. मेळा बसस्थानकाची सुंदर इमारत उभी राहिल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी सीबीएसचे काम हाती घेतल्यामुळे आता येथे देखील सुंदर इमारत उभी राहील. या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येऊन कामास सुरुवात करण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *