कर्जाला कंटाळून डॉक्टरांनी उचलले टोकाचे पाऊल

सिन्नर : नाशिकच्या गंगापुर भागात राहणार्‍या एका एमबीबीएस डॉक्टरने यकृताचा बळावलेला आजार आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून सिन्नर येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (दि.10) सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास उघडकीस आला. डॉ. स्वप्नील  पाटील (37) रा. गंगापुररोड, नाशिक असे मयत डॉक्टरचे नाव असून आत्महत्येपुर्वी त्या डॉक्टरने लिहून ठेवलेली सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागली आहे.
सिन्नर शहरातील बसस्थानकाजवळील हिरालाल टॉवरमधील हॉटेल प्रेसिडेन्ट लॉजमध्ये डॉ. स्वप्नील पाटील हे शनिवारी (दि.9) दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास आले होते. रुम नं. 109 त्यांनी भाड्याने घेतल्यानंतर सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास या रुममधून बाहेर आल्याचे सी.सी.टी.व्ही.त दिसले. त्यानंतर त्यांनी आपल्या रुमचा दरवाजाच उघडला नाही. रविवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास संशय बळावल्याने लॉजवरील कर्मचार्‍याने दरवाजा ठोठावला मात्र आतुन प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सदर कर्मचार्‍याने दरवाजाच्या वरच्या भागात असलेल्या खिडकीतून आत पाहिले असता बेडवर डॉ. पाटील दिसून आले. माजी नगरसेवक शैलेश नाईक यांनी यासंदर्भात सिन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, हवालदार चेतन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत रुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी डॉ. पाटील यांचा मृतदेह बेडवर पडलेला दिसून आला. स्वतःच डॉक्टर असल्याने त्यांनी रुमच्या खिडकीला सलाईन टांगून ते आपल्या हाताला लावून घेतले होते. याशिवाय काही गोळ्याही त्यांनी सेवन केल्याचे आणि त्याची अर्धवट रिकामी पाकीटे मृतदेहाजवळ आढळून आले.
दारूची बाटलीही घटनास्थळी पडून होती. पोलिसांनी जागेवर पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांनी रक्तनमुना आणि व्हीसेरा राखून ठेवला असून डॉ. निर्मला गायकवाड यांनी शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आजारपणाला कंटाळून आत्महत्या
सुसाईड नोटमध्ये हे कृत्य आपण स्वतःच्या मर्जीने करत असून माझ्यावर कुठलाही दबाव नाही. पत्नीने आत्तापर्यंत खूप साथ दिली. आईवडीलांनी, भावाने काबाडकष्ट केले मात्र लिवरच्या आजाराने त्रस्त असल्याने मी आत्महत्या करत असून त्यास इतर कोणालाही जबाबदार धरू नये. मी माझे कर्तव्य पार पाडू शकलो नाही, त्याबद्दल मला क्षमा करावी. लिवरच्या आजारामुळे आठतास काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे सद्या नोकरी नाही. घरी बसलो तर लोकं नावं ठेवतील, आजारपणामुळे कर्ज झाले आहे. त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. असे डॉ. स्वप्नील पाटील यांनी आपल्या सुसाईडनोटमध्ये लिहून ठेवले आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकरोड ‘एमपीए’च्या पदाधिकार्‍यांची निवड

नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…

2 hours ago

भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी

नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…

2 hours ago

नैसर्गिक साधनांचा वापर करत विद्यार्थ्यांनी बनवली 140 घरटी

चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…

3 hours ago

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले?

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको :  विशेष प्रतिनिधी सरकार…

3 hours ago

लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड

लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड   राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे…

3 hours ago

अमेरिकेचा मोठा शत्रू

अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…

17 hours ago