नाशिक

नाशिक -हैदराबाद,नाशिक -दिल्ली विमानसेवा लवकरच होणार सुरू

 

खासदार गोडसे यांची माहिती

नाशिक – कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे .नाशिक – हैदराबाद आणि नाशिक -दिल्ली विमानसेवा आता अवघ्या काही दिवसातच पुन्हा सुरळीतपणे सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे .सदर विमानसेवा स्पाईस जेट कंपनीकहून पुरवण्यात असून नाशिक -हैदराबाद आठवड्यातून सहा दिवस तर नाशिक -दिल्ली विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. नाशिक -हैद्राबाद आणि नाशिक -दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याने व्यापारी,उद्योजक उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र शासनाच्या उडान 2 योजनेअंतर्गत नाशिक शहर देशभरातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडले जावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाच वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले होते.यासाठी खासदार गोडसे यांनी वेळोवेळी संसदेमध्ये आवाज उठवला होता. तत्कालीन मंत्री महोदय आणि नागरी वाहतूक प्रशासनाकडे गोडसे यांचा सतत पाठपुरावा सुरू होता .विमानसेवेसाठी खासदार गोडसे यांनी दिल्लीत जाऊन नागरी हवाई मंत्रालयासमोर आंदोलनही केले होते. खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून तीन वर्षांपूर्वी नाशिक येथील ओझर विमानतळावरून प्रत्यक्ष विमानसेवेस प्रारंभ झाला होता. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील व्यापारी आणि उद्योजकांकडून या हवाई विमानसेवेला दोन वर्ष भरभरून प्रतिसाद मिळाला होता.परंतु कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे विमानसेवा बंद करण्यात आली होती.
विमानसेवा बंद झाल्याने नाशिकसह धुळे ,जळगाव आणि अहमदनगर येथील व्यापारी आणि उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.नाशिक – हैदराबाद, नाशिक – दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी खासदार गोडसे यांनी काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले होते .अखेर आता गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. स्पाइस जेट कंपनी प्रशासनाने आज खासदार गोडसे यांना नासिक – हैदराबाद आणि नाशिक – दिल्ली या दरम्यानच्या हवाई सेवेचे शेड्युलिंग पाठविले असून लवकरच विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती कळविली आहे. नाशिक -हैदराबाद विमानसेवा शनिवार वगळता रोजच तर नाशिक – दिल्ली विमानसेवा रोजच उपलब्ध असणार आहे. हैदराबाद – नासिक हे विमान हैदराबाद येथून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी निघणार असून तेच विमान पुन्हा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ओझर येथून हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे. दिल्ली -नाशिक हे विमान सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी रोज दिल्ली येथून नाशिकसाठी उड्डाण घेणार असून तेच विमान नाशिकहून पुन्हा दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी दिल्लीसाठी टेक- अप होणार आहे. नासिक – हैदराबाद या विमानात प्रवाशांची क्षमता 80 असणार असून हा प्रवास अवघ्या 90 मिनिटांचा रहाणार आहे. तर नाशिक -दिल्ली विमानात विमानात 189 प्रवाशांची आसन क्षमता असणार असून प्रवास दोन तासांचा असणार आहे.

Ashvini Pande

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

2 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

2 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

11 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

23 hours ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago