नाशिक:प्रतिनिधी
नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी विविध प्रकारचे प्लॅन आखण्यात आले होते. तर अनेकांनी पर्यटनस्थळी जात थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे ठरवले होते. परिणामी शहरातील पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यात नाताळाच्या सुट्ीचा मुहुर्त साधत पर्यटनाचे प्लॅन करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकला पर्यटकांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
शहरातील हॉटेल्स व लॉज पर्यटकांनी हाऊसफुल झाले आहेत. नाताळच्या सुट्टीत धार्मिक पर्यटन स्थळांना भेट देण्याकडे पर्यटकांचा कल असतो.महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटकांनी नाशिकला पसंती दिली आहे.महाराष्ट्रासह गुजरात,कर्नाटक,पश्चिमबंगाल,आंध्रप्रदेश,उत्तरप्रदेश,राजस्थान,तामिळनाडू या राज्यातील पर्यटकांनी नाशिक फुलली आहे. नाशिक शहरातील प्रमुख धार्मिक स्थळासह त्रंबकेश्वर ,वणी ,शिर्डी या धार्मिक स्थळांना पर्यटक जात आहेत.तसेच शहरातील प्रमुख स्थळ पाहता यावेत यासाठी नाशिक दर्शन करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. भोजनालयात,हॉटेल्स,खानावळीत गर्दी होत आहे.
त्यामुळे कोरोनाच्या दोन वर्षानंतर हॉटेल्स व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. तर पंचवटी परिसरातील हॉटेल्स,लॉज फुल आहेत.तसेच शहरातील पंचवटी,इंद्रकुंड ,रामकुंड,कपालेश्वर मंदिर,काळाराम मंदिर ,गोराराम मंदिर,तपोवन,मुक्तीधाम,भगूर,पांडवलेणी तसेच नवीन झालेल्या सुंदर नारायण मंदिरातही पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
देवदर्शनाने नवीन वर्षाचे स्वागत
नवीन वर्षाचे स्वागत देवदर्शनाने करावे असे अनेकांचे नियोजन असल्याने नाशिक शहरात पर्यटकांची गर्दी होत आहे.
व्यावसायिकांना अच्छे दिन
पर्यटकांची गर्दी होत व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. कोरोनामुळे दोन वर्षात व्यावसायिकांना अर्थिक फटका सहन करावा लागला होता. मात्र आता पर्यटकांचा ओघ वाढल्याने व्यावसायिक समाधान व्यक्त करत आहेत.
पर्यटकांची स्मार्ट कोंडी
नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या पर्यटकांची स्मार्ट सिटीने गोदा घाटावर खोदकाम केल्यामुळे स्मार्ट कोंडी होत असल्याचे चित्र आहे.