नाशिक महापालिकेचा डाटा हॅक करण्याचा प्रयत्न

नाशिक: हॅकर्स ने सायबर हल्ला करत नाशिक महापालिकेचा डाटा हॅक करण्याचा प्रयत्न झाला, मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून हा सायबर हॅक चा प्रयत्न उधळून लावला, याप्रकरणी सायबर पोलिसात महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तक्रार दाखल केली आहे,
ग्लोबल आयपी ॲड्रेस तपासणीनंतर अमेरिकन हायजॅकर्स असल्याचे लक्षात आले. त्यानंतर संभाव्य हल्ला रोखण्यासाठी डाटा अधिक सुरक्षित करण्यात आला आहे,
एकूण ४३ विभागांमधील संपूर्ण माहितीचे डिजिटायझेशन सुरू असून हा डाटा सुरक्षित करण्यात आला आहे. यासाठी स्वंतत्र आयटी विभाग निर्माण करण्यात आला. आयटी विभागाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते. सोबतच महापालिकेच्या वेबसाइटची सुरक्षा करण्यासह ऑनलाइन विभागाच्या तक्रारींचे वर्गीकरण करण्याचे काम आयटी विभागाकडून केले जाते. गेल्या आठवड्यात अमेरिकन हॅकर्सने संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस पाठवत, संगणकीय यंत्रणा ठप्प केली. मात्र, दक्ष असलेल्या आयटी विभागाने २४ तास हायजॅकर्सशी लढा देऊन हॅकर्सला पळवून लावले. संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस घुसविण्यात आल्याची माहिती समोर आली.

 

हॅकर्स आणि क्रिमिनल जेव्हा एखाद्या सरकारी वेबसाईट मधील डेटा चोरायचे प्रयत्न करतात तेव्हा तेथील सुरक्षायंत्रणा जर तो हॅकर पकडता आला नाही तर ते हॅकर्स अजून विविध प्रकारे विविध ठिकाणचा डेटा चोरून ते विकू शकतात तसेच त्या डेटाचा गैरवापर करू शकतात त्यामुळे वेबसाईट वरती असलेला डेटा सुरक्षित करणे हे अत्यावश्यक आहे.

डॉ. तन्मय स दीक्षित,
सायबर फॉरेन्सिक तज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *