नाशिक मनपा निवडणूक 2025-26 : भाजपला स्पष्ट बहुमत

29 पैकी 25 महापालिकांत महापौर होणार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या 76 नगरसेवक जागांपैकी भाजपला मोठे यश मिळाले असून, मागील निवडणुकीतील 66 जागांपासून आता 76 जागांवर पक्षाचा विजय झाला आहे. एबी फॉर्मचे वाटप करताना झालेल्या गोंधळामुळे 10 ते 15 जागा भाजपच्या हातून गेलेल्या असल्या तरीही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
जलसंपदा व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, राज्यातील इतर महापालिका निवडणुकीतही भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, 29 पैकी 25 महापालिकांमध्ये भाजपचा महापौर
होणार आहे.
भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी 4 वाजता आयोजित आनंदोत्सवात आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, संघटनमंत्री रवि अनासपुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, माजी महापौर बाळासाहेब सानप, नाना शिलेदार, सरचिटणीस सुनील देसाई, गोविंद्र बोरसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री महाजन यांनी पुढे सांगितले की, जळगाव महापालिकेत पक्षाने दिलेले 46 पैकी 46 उमेदवार विजयी झाले आहेत, तर अहिल्यानगर महापालिकेतही महायुतीची सत्ता आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात आमदार, नगरपरिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडून आल्याने भाजपच्या 100 टक्के सत्तेची निर्मिती झाली आहे.
नाशिकमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त विकासावर बोलले. त्यामुळे मतदारांचा विश्वास वाढला आणि काही लोकांच्या फालतू बडबडीमुळे होणार्‍या नुकसानापेक्षा भाजपच्या उमेदवारांना फायदा झाला. मंत्री महाजन म्हणाले, “लोकांनी फालतू बडबडीवर बॅण्ड वाजवून निषेध व्यक्त केला.”
एबी फॉर्मच्या गोंधळाबाबत बोलताना सांगितले की, 107 तिकिटे बरोबर दिली गेली आणि शेवटच्या 10 ते 12 तिकिटांमध्ये गोंधळ झाला, मात्र आयात केलेले सर्व उमेदवार विजयी
झाले आहेत.
महापालिकेतील भाजपच्या यशाबाबत महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार म्हणाले, ‘भाजपचा उच्चांक भाजपनेच मोडला. प्रत्येकवेळी विकासाचे राजकारण केले म्हणूनच नाशिकमध्ये घवघवीत यश
मिळाले आहे.’

Nashik Municipal Corporation Election 2025-26: BJP gets clear majority

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *