मनपाला ढोल वादन पावले

 

एक कोटींवर कराची  वसुली

नाशिक( nashik):  प्रतिनिधी

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदेशानुसार कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सोमवार पासून (दि. 17) एक लाखांच्या पुढे असलेले थकबाकीदार यांच्या घरासमोर किंवा आस्थापनांसमोर ढोल वाजविण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे. मोहिमेच्या दुसर्‍या  दिवशी मंगळवारी ( दि. 18) तब्ब्ल 1 कोटी 9 लाख 66 हजार 335 रुपयांची कर वसुली झाली आहे. नाशिक nashik nmc पश्चिम विभागात सर्वाधिक 62 लाख 76 हजारांची वसुली झाली आहे.

नवीन नाशिक विभागात 21 लाख 94 हजार 416 रुपये वसुली झाली आहे. सहा विभाग मिळून एकूण %4 ठिकाणी ढोल वाजविण्यात आले. एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेले एकूण 1258 थकबाकीदार आहेत. त्यांची नावे नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. सुट्टीचे दिवस वगळता एकूण 19 दिवस ही मोहिम सुरु राहणार असल्याची माहिती कर विभागाने दिली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरावी तसेच चालू वर्षीचा कर भरुन नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जे कर भरणार नाहीत. त्यांच्या घरासमोर, आस्थापनांसमोर ढोल पथक ढोल वाजवणार आहे. वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरुच राहणार असल्याची माहिती कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली. थकबाकी दारांकडे जी थकीत रक्कम आहे ती लवकरात लवकर भरावी याकरिता दोन दिवसापासून शहरात ढोल वादन केले जात आहे

हेही वाचा : शहरात आढळले क्षयरोगाचे 6 रुग्ण

 

विभागनिहाय कर वसुली खालीलप्रमाणे

नाशिक पूर्व – 4,85,000 रुपये

नाशिक पश्चिम –  62,%6,000 रुपये

पंचवटी –    15,05,590 रुपये

नाशिक रोड-   1,52,000 रुपये

नवीन नाशिक-   21,94,416 रुपये

सातपूर –     3,53,329 रुपये

एकूण – 1 कोटी 9 लाख 66 हजार 335 रुपये

……………………………………………………….

ढोल वाजविण्यात आलेली मिळकत संख्या

नाशिक पश्चिम – 25

नाशिक पूर्व – 15

नविन नाशिक -9

पंचवटी – 13

नाशिक रोड – 7

सातपूर- 5

एकूण – 74

हेही वाचा: मनपा आयुक्तांचा मोर्चा शहरातील डीपी रस्त्यांकडे

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *