एक कोटींवर कराची वसुली
नाशिक( nashik): प्रतिनिधी
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदेशानुसार कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सोमवार पासून (दि. 17) एक लाखांच्या पुढे असलेले थकबाकीदार यांच्या घरासमोर किंवा आस्थापनांसमोर ढोल वाजविण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे. मोहिमेच्या दुसर्या दिवशी मंगळवारी ( दि. 18) तब्ब्ल 1 कोटी 9 लाख 66 हजार 335 रुपयांची कर वसुली झाली आहे. नाशिक nashik nmc पश्चिम विभागात सर्वाधिक 62 लाख 76 हजारांची वसुली झाली आहे.
नवीन नाशिक विभागात 21 लाख 94 हजार 416 रुपये वसुली झाली आहे. सहा विभाग मिळून एकूण %4 ठिकाणी ढोल वाजविण्यात आले. एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेले एकूण 1258 थकबाकीदार आहेत. त्यांची नावे नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. सुट्टीचे दिवस वगळता एकूण 19 दिवस ही मोहिम सुरु राहणार असल्याची माहिती कर विभागाने दिली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरावी तसेच चालू वर्षीचा कर भरुन नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जे कर भरणार नाहीत. त्यांच्या घरासमोर, आस्थापनांसमोर ढोल पथक ढोल वाजवणार आहे. वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरुच राहणार असल्याची माहिती कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली. थकबाकी दारांकडे जी थकीत रक्कम आहे ती लवकरात लवकर भरावी याकरिता दोन दिवसापासून शहरात ढोल वादन केले जात आहे
हेही वाचा : शहरात आढळले क्षयरोगाचे 6 रुग्ण
विभागनिहाय कर वसुली खालीलप्रमाणे
नाशिक पूर्व – 4,85,000 रुपये
नाशिक पश्चिम – 62,%6,000 रुपये
पंचवटी – 15,05,590 रुपये
नाशिक रोड- 1,52,000 रुपये
नवीन नाशिक- 21,94,416 रुपये
सातपूर – 3,53,329 रुपये
एकूण – 1 कोटी 9 लाख 66 हजार 335 रुपये
……………………………………………………….
ढोल वाजविण्यात आलेली मिळकत संख्या
नाशिक पश्चिम – 25
नाशिक पूर्व – 15
नविन नाशिक -9
पंचवटी – 13
नाशिक रोड – 7
सातपूर- 5
एकूण – 74
हेही वाचा: मनपा आयुक्तांचा मोर्चा शहरातील डीपी रस्त्यांकडे
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…
गड-किल्ले, डोंगरदर्या चढून तिथल्या निसर्गसौंदर्याने भारावून जाणे आणि इतिहासाची माहिती घेणे असा दुहेरी आनंद मिळतो…
आई सकाळी सडा-रांगोळी करायची. अंगणातल्या तुळशीची मनोभावे पूजा करायची. आणि स्नानसंध्या झाली की कपाळावर छान…