नाशिक ग्रामीण पोलिसांचे अवैध व्यवसाय विरोधी अभियान

नाशिक ग्रामीण पोलीसांचे अवैध व्यवसाय विरोधी अभियान

मागील ८ दिवसांत ११९ आरोपींविरुध्द ७० गुन्हे दाखल

लासलगाव:समीर पठाण

मागील काही महिन्यांपासून नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांविरोधी अभियान छेडले असून जिल्हयातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी,स्थापित करण्यात आलेल्या ०८ विशेष पथकांसह अवैध दारू निर्मितीची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी मुख्यालयाकडून महिला पोलीस अंमलदारांची ०३ पथके देखील गठीत करण्यात आली आहेत.जिल्हयातील अवैध मटका-जुगार, गुटखा,अंमली पदार्थ,वेश्याव्यवसाय,अन्न भेसळ यासह सर्वच प्रकारच्या व्यवसायांवर कारवाया करण्यात येत आहेत.

नाशिक ग्रामीण पोलीसांनी जिल्हयातील गुटखा हद्यपार करण्यासाठी यापूर्वी तीन अभियान राबवले असून दिनांक ०६/१०/२०२३ रोजीपासून गुटखा विरोधी अभियान सुरू करण्यात आले आहे.मागील (८) दिवसांत नाशिक ग्रामीण पोलीसांनी,अवैध व्यवसायांविरूध्द एकूण ७० ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली आहे.यात मुंबई दारूबंदी कायद्याखाली ३६,महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली १५,गुटखा विरोधी १८ कारवायांचा समावेश असून निफाड पोलीस ठाणे हद्दीतील बोकडदरे शिवारात भेसळयुक्त दूध बनवणा-या इसमांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.पथकांनी केलेल्या सदर कारवायांत एकूण ११९ आरोपींना ताब्यात घेण्यात आलेअसून एकूण १८ लक्ष १७ हजार रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

जिल्हयातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलीसांपर्यंत पोहोचावी,या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी खबर ही हेल्पलाईन सुरू केली असून,नागरिकांनी ६२६२ २५ ६३६३ या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या परिसरात चालणा-या अवैध व्यवसायांची माहिती नाशिक ग्रामीण पोलीसांना द्यावी,असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *