बाबागीरी करत असल्याच्या संशयावरून घडला प्रकार
पंचवटी: प्रतिनिधी
पेठ रोडवरील फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात सोमवारी (२ जून) मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनपाच्या ५६ नंबर शाळेच्या समोर असलेल्या प्रवीण किराणा दुकानाजवळ ही घटना घडली. संजय तुळशीराम सासे (वय ४०, रा. घर क्र. १२८८, महालक्ष्मी चाळ, महाराणा प्रताप नगर, पेठ रोड, पंचवटी) असे मृताचे नाव आहे. संजय सासे हे बाबागिरी करीत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यात घाव घालून त्यांचा खून केला. या प्रकरणी रुपाली संजय सासे यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…
लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…