नाशिक पुन्हा हादरले: महालक्ष्मी नगरमध्ये युवकाची हत्या, दोघे ताब्यात

नाशिक पुन्हा हादरले

महालक्ष्मी नगरमध्ये युवकाची हत्या, दोघे ताब्यात
सिडको : दिलीपराज सोनार

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबड औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या महालक्ष्मी नगर परिसरात रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या युवकावर कोयत्याने सपासप वार करत निर्घृण खून करण्यात आला. प्रशांत भदाणे (वय २२) असे मयताचे नाव असून तो अंबड परिसरातील रहिवासी होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे दरम्यान मयत तरुण हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते

प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत भदाणे हा रात्री दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपींनी त्याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर गंभीर वार झाले असून घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.

अंबड पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी मयत आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या वादातूनच खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी आणि मयत हे एकाच परिसरात राहणारे असून त्यांच्या वादाचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.सध्या अंबड पोलीस अधिक तपास करत असून हल्ल्यात वापरलेला कोयता जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.दरम्यान अंबड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि मययाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला रात्रीच्या सुमारास पावसाची रिपरिप सुरु असल्याने पंचनामा करतांना अनेक अडचणी येत असतांना दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस मधुकर कड यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तात्काळ दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *