चालकांसाठी उभारणार विश्रांतीगृह, हेल्थ चेकअप सेंटरसह ट्रेनिंग सेंटर उभरणार : राजेंद्र फड
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेखाली (दि.१७ ते १९) मार्च या कालावधीत ठक्कर डोम येथे ‘ऑटो ॲण्ड लॉजिस्टिक एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऑटो आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सर्व घटक एका छताखाली येणार आहे. या ऑटो ॲण्ड लॉजिस्टिक एक्स्पो’च्या माध्यमातून चालकांसाठी विश्रांतीगृह, हेल्थ चेकअप सेंटरसह ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा संस्थेचा मानस असल्याची माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी, उपाध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत, सचिव शंकर धनावडे, सल्लागार जे.पी.जाधव, सुनील बुरड, एम.पी.मित्तल, कृपाशंकर सिंह, हरनारायन अग्रवाल, बजरंग शर्मा, दिपक ढिकले, सुनील जांगडा, निटस् मिडियाचे संचालक नितीन भोसले, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना फड म्हणाले की, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून नाशकात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर ऑल व्हील डिस्प्ले या संकल्पनेखाली भव्य ‘ऑटो ॲण्ड लॉजिस्टिक एक्स्पो’ चे आयोजन करण्यात आले आहे. दळणवळण क्षेत्राशी निगडित सर्व घटक एकछत्राखाली आणण्यासोबत वाहतूक क्षेत्रातील महत्वाचा घटक असलेल्या चालकांसाठी विश्रांतीगृह, हेल्थ चेकअप सेंटरसह ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.या तीन दिवसीय एक्स्पो मध्ये अगदी सायकलपासून ते ट्रेलर पर्यंत सर्व छोट्या मोठ्या वाहनांचा समावेश असणार आहे. शिवाय ऑटो व लॉजिस्टिक्स व्यवसायाशी निगडित सर्व घटकहि एक्स्पो मध्ये सहभाग घेणार आहेत तसेच विविध नामांकित कंपन्या व संस्था त्यांचे या ठिकाणी स्टॉल उभारणार आहेत. हा ऑटो ॲण्ड लॉजिस्टिक एक्स्पो ऑटोमोबाईल इंडस्ट्री, लॉजिस्टिक्स इंडस्ट्री , व नाशिककरांसाठी मोठी पर्वणी ठरणार असून उद्योजकांना मोठं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ट्रॅफिक नियोजनाबाबत स्पर्धा, वाहतूक नियोजनाबाबत तज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चा सत्र, उद्योजक, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम यासह विविध
नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या स्तरावर होणारा हा पहिला लॉजिस्टिक एक्स्पो आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विविध ईव्ही उत्पादने विक्रीसाठी येत असून सदर एक्स्पो मध्ये सर्व ईव्ही एकाच छताखाली बघावयास मिळणार असून हा एक्स्पो नाशिककरांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.