नाशिक

स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक अग्रस्थानी

 

नाशिक : वार्ताहर

स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा.) २०२३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) चे प्रकल्प संचालक रणधीर सोमवंशी यांनी दिले असुन याअंतर्गत राज्यात १५२३ कामे पूर्ण करुन नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. नाशिकचे ७९.१९ टक्के काम पूर्ण झालेले आहे. याचवेळी लातूर, नांदेड या जिल्ह्यांचे काम चांगल्या स्वरुपात सुरु आहेत. त्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत प्रथम गाव निहाय स्वयं मुल्यांकन जरी ३१ डिसेंबरपर्यंत करणे आवश्यक असले तरी मुल्यांकनाचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना केंद्राकडून प्राप्त झाल्या असल्याने १५ डिसेंबरपर्यंत मुल्यांकन त्वरेने पूर्ण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. याबाबतीत बिड जिल्ह्याने अद्यापही स्वयंमुल्यांकन सुरु केलेले नसल्याचे समोर आले आहे तर परभणी, नागपूर स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा) २०२३ अंतर्गत होणाऱ्या सर्वे रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव या जिल्ह्यांचे एक ही गाव क्षणासंबंधी सूचना राज्यस्तरावरुन वारंवार देण्यात आल्या स्वयं मुल्यांकनाचे पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Ashvini Pande

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

13 hours ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

13 hours ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

13 hours ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

14 hours ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

14 hours ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

14 hours ago