नाशिक:प्रतिनिधी
उत्तर भारतातून येणार्या शीतलहरीमुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. काल दिवसभर वातावरणातील गारव्यामुळे नागरिक थंडीने गारठून गेले. गुरूवारची (दि.15) पहाट उजाडली तीच दाट धुके घेऊन.शहरावर दाट धुक्याची चादर आच्छादलेली होती. शहरात गेल्या काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत तर सुर्यदर्शनही झाले नाही ..त्यात दिवसभर वातावरणात गारवा होता .. तर संध्याकाळी 6 वेळेनंतर परत वातावरणात धुके निर्माण झाले होते.. परिणाम थंडीने नाशिककर चांगलेच गारठले आहेत.शहरात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. शहरातील नागरिकांसाठी धुक्याची वेगळी गंमत असली तरी शेतकर्यांची मात्र धाकधूक वाढली आहे. उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे वातावरणात गारवा आणि थंडी वाढली आहे.
मात्र, दाट धुके पडल्याने नागरिक मनमोहक अशा धुक्याचा आनंद घेताना दिसली . काल अधिकच दाट धुके पडले होते. पहाटेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत धुके होते. तोपर्यंत चांगलचा गारठा जाणवत होता.
गंगापूर रोड,उपनगर,नाशिक रोड,इंदिरा नगर, सातपूर, अंबड, पाथर्डी फाटा यासह शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धुके पडले होते.हिवाळ्यात नाशिक शहरात दरवर्षी दाट धुके पडते. पण यंदा सातत्याने वातावरणात बदल होत आहे. शहरात दाट पडलेल्या धुक्यात जॉगींगसाठी आलेल्या नाशिककरांनी चहा टपर्यावर गर्दी केली होती .तर अनेकांनी धुक्यामध्ये फोटो काढत सोशल मिडीयावर अपलोड केले. नाशिककर धुक्याच्या दुलाईचा आनंद घेताना दिसत होते.
थंडीत खाद्य पदार्थाचा आस्वाद
थंडी वाढल्याने थंडीपासून बचावासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यात खवय्ये मात्र थंडीचा आस्वाद घेत असतानाच कुरकुरीत भज्जी चा आस्वाद घेत आहेत. चहा आणि गरम भज्जी असे थंडी विसरायला लावणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात नाशिककर दंग असल्याचे चित्र आहे.
दिवसभर स्वेटरमध्येच वावर
यंदाच्या वर्षी थंडीचा कडाका जाणवत नव्हता .मात्र जानेवारीच्या सुरूवातीपासूनच दिवसेंदिवस थंडीत वाढ होत आहे. त्यात काल दिवसभर थंडीत धुके ही असल्याने वातावरणात अधिक गारठा होता .त्यामुळे नाशिककरांनी दिवसभर गरम कपडे परिधान केल्याचे चित्र होते.