थंडीचा कडाका वाढल्याने नाशिककर आजारी




नाशिक : प्रतिनिधी

शहरातील वातावरणात मागील काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहे. थंड वारे, गारवा, दाट धुके या बदलामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकल्यासह साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. शहरातील रूग्णालयात रूग्नांची संख्या वाढत आहे. वातावरण सतत बदलत असल्याने ताप, डोके दुखी, अंग दुखणे, सर्दी, खोकला, वात विकार, हाडे दुखणे इत्यादी आजार वाढले असल्यामुळे रुग्णालयात नेहमीपेक्षाही अधिक गर्दी होत आहे. शहरातील तापमानातही सतत चढ उतार होत आहेत. कालचे शहरातील किमान 10.3 अंश तापमान इतके तर कमाल 21.5 अंश तापमान नोंदवले गेले. सततच्या वातावरणातील बदलामुळे आरोग्याची काळजी नागरिकांना कठीण जात आहे. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे.
परिणामी शहरातील रूग्णालयात थंडी ताप, सर्दी खोकल्याच्या रूग्णांची संख्या वाढली चांगलीच वाढली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.

शहरात सकाळी आणि संध्याकाळी कडाक्याची थंडी असते तर दुपारी मात्र उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. त्यामुळे वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिराम होत आहे. यंदाच्या वर्षीचा थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. त्यात पाच राज्यात थंडीचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे थंडी अधिक वाढण्याचा अंदाज असल्याने वाढत्या ्थंडीत आरोग्याची काळजी घेण्याचे नागरिकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.


थंडीत अशी घ्या आरोग्याची काळजी

थंडीत पौष्टिक आहार हवा त्याचबरोबरच फलाहार, सुकामेवा हे उपयुक्त ठरेल. नियमित व्यायाम, वॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. शीतपेय, शिळे पदार्थ, उघड्यावरचे खाणे टाळावे. या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहार सेवन करा.

   हवामानातील बदलामुळे या दिवसांत शीतपेय, शीतपाणी पिणे टाळा, तसेच वातानुकूलित यंत्रणांचा वापर करणे टाळा.थंडीत बाहेर पडताना गरम कपड्यांचा वापर करा. तसेच आरोग्या संबंधी तक्रार जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या.

डॉ. पल्लवी बाविस्कर 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *