सीसीटीव्ही मध्ये कैद, कोयते, तलवारीचा वापर
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिक शहरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे चित्र आहे. गुन्हेगारावर पोलिसांचा कोणताही धाक नसल्याने दिसून येत आहे. नाशिकरोड परिसरातील देवळाली गाव भागात महसोबा मंदिरामागे असलेल्या हरी श्रद्धा अपार्टमेंट मध्ये मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शिबान शेख बबलू या 27 वर्षीय युवकावर चार ते पांच जणांनी जीवघेणा हल्ला करून जखमी केले आहे.
हरी श्रद्धा अपार्टमेंट मध्ये राहणारा शीबान हा आपल्या घरी जात असताना चार हल्लेखोरांनी हातात तलवारी, कोयते या तीक्ष्ण हत्यारांनी वार करून शिबान यास जखमी केले. शिबन शेख बबलू याच्यावर इतके वार झाले की त्याला उठता सुद्धा येत नव्हते, त्याला त्वरित नाशिकरोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. या जीवघेणा हल्ल्यामुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसापासून शहरात जीवघेणे हल्ले, खून, दरोडे, तसेच चोऱ्यांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढले असून पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याने नागरिक भयभीत आहे. हल्ल्याचा संपूर्ण जीवघेणा हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून उपनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…