नाशिकरोडला विवाहितेचा निर्घृण खून
नाशिक : प्रतिनिधी
सामनगाव येथे एका विवाहित महिलेवर चाकूने वार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिलेचा भाचाही गंभीर जखमी झाला आहे, सामनगाव येथील तांबोळी हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या मूळच्या उत्तरप्रदेश येथील सुदाम बणारीया हा पाणीपुरी चा व्यवसाय करतो, पत्नी क्रांती सह तो येथे भाडे तत्वावर असलेल्या खोलीत बुधवारी रात्री क्रांती व भाचा अभिषेक (27) हे दोघे घरात एकटे होते, यावेळी अज्ञात इसमाने क्रांती व अभिषेक या दोघांवर चाकूने हल्ला केला यात क्रांतिचा मृत्यू झाला तर अभिषेक याच्यावही वार केल्याने तो गंभीर जखमी झाला,क्रांतीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने ती जागीच मृत्यू मुखी पडली, हा हल्ला करणारे हल्लेखोर पसार झाले, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे दाखल झाले, जखमी अभिषेक यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात आहे, पोलीस हल्लेखोर चा शोध घेत आहे