शिवकार्य गडकोट संस्थेतर्फे कुंभमेळा अधिकार्यांना निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक गडकिल्ले आहेत. नाशिकला लाभलेल्या सह्याद्रीच्या नऊ शिखरांत 60 हून अधिक गडकिल्ले आहेत. जिल्ह्यातील प्राचीन वाडे, होळकरकालीन बारवा, विविध वीरांच्या पराक्रमाच्या घटना येथे घडल्या आहेत. आगामी वर्षात होणारा कुंभमेळा यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे 25,055 कोटींपेक्षा अधिक निधी खर्ची होणार आहे.
त्याबाबतीत कुंभमेळा प्राधिकरणही स्थापित झाले असून, जिल्हा कुंभमेळा बैठकीत संबंधित निधीबाबतीत जिल्ह्यातील गडकिल्ले व ऐतिहासिक पाऊलखुणा संवर्धनाकामी कुठलीही आर्थिक तरतूद दिसत नाही. नाशिकच्या इतिहासाच्या पाऊलखुणांसोबतच जिल्ह्याचा वैविध्यपूर्ण इतिहास व त्याची कुंभमेळ्यात देश-परदेशातून येणार्यांची माहिती देणारी व्यवस्था निर्मिती बाबतीत काय नियोजन केले? असा सवालही निवेदनात केला गेला
आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे व प्रत्यक्ष कुंभमेळा प्राधिकरण अधिकार्यांसमोर मांडण्यात आलेल्या निवेदनात 15 व्या शतकातील आदर्श बागुलराजा, सातवाहन, सातकर्णी राजा, त्यानंतरच्या यादव, होळकर, मराठा, पेशवेकाळातील इतिहासाच्या पाऊलखुणा त्या-त्या काळातील घटना, कुंभमेळ्यातील देश-परदेशातील भाविकांना समजावून सांगणे, तसेच नाशिकचे गडकिल्ले प्रत्यक्ष दाखवणे, त्याबाबतील कुंभमेळा प्राधिकरण यांनी नाशिकला ऐतिहासिक घटना व पाऊलखुणांची ओळख देणारे माहिती केंद्र स्थापन करावे, जिल्ह्यातील गडकोट संवर्धनकामी निधी तरतूद करावी, त्या नियोजनात नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेला सोबत घ्यावे, विश्वासात घ्यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. कुंभमेळा प्राधिकरण आयुक्तांशी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी सविस्तर चर्चा केली.
नाशिकच्या कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. कोट्यवधींचा निधी याकामी खर्ची होणार आहे. त्यातील काही तरतूद नाशिक जिल्ह्यातील 60 हून अधिक गडकोटांच्या संवर्धनासाठी खर्ची करावी. त्याबाबतीत नाशिकला माहिती केंद्र स्थापून नाशिकच्या ज्ञात-अज्ञात इतिहासाच्या घटना, घडामोडी देश-परदेशातील मंडळींना समजेल तशी व्यवस्था करावी. त्यामुळे जिल्ह्यातील गडकोट व त्यांच्या परिसरात पर्यटन व त्यातून रोजगार मिळेल. त्याकामी एक व्यवस्था निर्मितीसाठी आमच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेला कुंभमेळा नियोजन प्रक्रियेत सामावून घ्यावे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…