नाशिक: प्रतिनिधी
नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव हिने यूएसएमध्ये पार पडलेल्या १० हजार मीटर धावण्याच्या महिला गटातील स्पर्धेत ३२ मिनिटे ४६.८८ सेकंदांचा विक्रम प्रस्थापित करत रौप्यपदक पटकावले आहे. या यशातून नाशिकचे व महाराष्ट्राचे नाव उंचावले गेले आहे, ! गेल्या काही काळापासून संघर्षातून जात असलेल्या संजीवनीने पुन्हा एकदा घेतलेली ही भरारी अभिमानास्पद आहे. यशाचे असेच नवनवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी संजीवनीला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या