नाशिक : प्रतिनिधी
गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा शिवसेनेच्या बाबतीत उठवल्या जात आहेत.उद्धव ठाकरे व संजय राऊतही चाललेत एवढीच अफवा उठवणे बाकी आहे. अशा बातम्या येत असल्यातरी नाशकातील शिवसैनिक हा जागेवरच आहे.संघर्ष करत घाव झेलत आहे. अशी स्थिंती तर बाळासाहेबांनीही बघितली आहेत. त्यामुळे आता चर्चा न करता पक्ष मजबुतीसाठी सर्वांनी 16 तारखेेला होणार्या मेळाव्यातून आपली ताकद दाखवून द्या असे आवाहन शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी केले. येत्या 16 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येणार असून ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.त्या मेळाव्याच्या पार्श्वभुमीवर शिवसेना कार्यालयात शिवसैनिक व पदाधिकार्याना मार्गदर्शन करताना खा.राऊत बोलत होते. व्यासपीठावर उपनेते सिुनल बागुल, सुधाकर बडगुजर, अद्वय हिरे, अशोक धात्रक, संपर्क प्रमु जयंत दिंडे, खा.राजाभाऊ वाजे, सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, नितीन आहेर, गणेश धात्रक, कृणाल दराडे, महानगरप्रमुख विलास शिंदे, वसंत गीते, आनिल कदम, लोकसभा प्रमुख बाळासाहेब पाठक, उपजिल्हा प्रमुख केशव पोरजे, महेश बडवे, सचिन मराठे, कृलदिप चौधरी, मामा राजवाडे, दिलीप मोरे, युवासेना जिल्हाधिकारी राहूल ताजनपुरे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, बागलान संपर्कप्रमुख विकास गिते, शिवसेना पदाधिकारी राहूल दराडे, संजय चव्हाण, आजिम सैय्यद, मसूद जिलानी, संजय थोरवे, नितीन जाधव आदी उपस्थित होते.
संजय राऊत पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस नाशिक जिल्ह्यातील जागा शिवसेना व आघाडीचे उमेदवार जिकणार असा जनतेचा कौल होता. त्यामुळे जिल्ह्यातील जागांसाठी खेचाखेची सुरू होती. सुधाकर बडगुजर व वसंत गिते हे ए प्लस मध्ये होते. त्यांचे काम चांगले होते पण यश आले नाही याची कारणे आहेत. मात्र आता यातून बाहेर पडावे लागणार आहे.पुन्हा उभारी घ्यावी लागणार आहे. कारण नेते हातपाय गाळतात शिवसैनिक कधीच हातपाय गाळत नाही. आपल्या मताच्या चोर्या झाल्यात. आपल्यात भ्रम निर्माण करण्याचे काम केले गेले. त्यामुळे आता सावध होण्याची वेळ आली आहे, असेही राऊत म्हणाले.
भारतीय जनता पक्षाकडून गरिबांचा कैवारी म्हणून प्रचार केला जात असला तरी भाजप हा कधीच गरिबांचा कैवारी नाही. हा पक्ष केवळ पैशासाठी काम करतो. ते पैशाच्या जोरावरच निवडून आलेले आहेत. असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन सुरू करण्याचे मनसेसैनिकांना सांगितले आणि अवघ्या 24 तासात आंदोलन मागे घेतले. त्यांच्या लोकांनी कोणाला मारले तर वॉचमनला. राज ठाकरे आज जे आदोलन करत आहेत हे आंदोलन बाळासाहेबांनी सुरू केले आहे .त्यावेळी आम्ही वॉचमनला नाही तर चेअरमनला मारले त्यामुळे आज एअर इंडियात जय महाराष्ट्राचा नाद घुमतो आहे.असेही राऊत म्हणाले.
येत्या 16 तारखेला शिवसैनिकांचा होणारा मेळावा हा पुढच्या राजकीय कारकीर्दीसाठी महत्वाचा आहे. सर्वात चंचल काय असेल तर ते राजकारण आहे. कधी कोण आयाराम व गयाराम होईल याचा काही विश्वास नाही.त्यामुळे आता शिवसैनिकांनी तयार रहावे, नाशिक कायम शिवसेनेचच राहणार आहे असा विश्वास राऊत यांनी शेवटी व्यक्त केला.
यावेळी उपनेते सुधाकर बडगुजर, खा. राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्तविक महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी केले
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…
सिडको : विशेष प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपुर्वी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जनावरांच्या चोरीचा गुन्हा…