नाशिकरोड : वार्ताहर
युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा डायलेट करण्याचे टाळता येते. तसेच वारंवार कॅथेटरचा वापरही टाळता येऊ शकतो. नाशिकमध्ये ही सुविधा आता उपलब्ध झाली आहे, अशी माहिती किम्स मानवता हॉस्पिटलचे प्रसिद्ध किडनी रोगतज्ज्ञ डॉ. परीक्षित महाजन यांनी दिली. तसेच याच हॉस्पिटलमधील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मयूर पेखळे यांनी (गुडघे) जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल सविस्तर माहिती दिली. ऑस्ट्रिओअथ्रायटिस (संधिवात) असणार्या रुग्णांमध्येही विशेषतः वयस्कर रुग्णांमध्ये विविध किचकट सर्जरी यशस्वीपणे पार केल्याचे त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून दाखवून दिले. डॉ. परिक्षित महाजन यांनीही दृकश्राव्य माध्यमाचा आपल्या भाषणात उपयोग करून केलेल्या शस्रक्रियांची माहिती दिली या दोघांनीही अतिशय उद्बोधक माहिती दिली. सर्व डॉक्टरांनी टाळ्यांच्या गजरात या दोघांचे कौतुक केले.
नाशिकरोड मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी श्री धन्वंतरीचे पूजन मान्यवर डॉक्टरांनी केले. डॉ. परिक्षित महाजन यांचा डॉ. अशोक निरगुडे यांनी तर डॉ. मयूर पेखळे यांचे स्वागत व सत्कार एमपीएचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पुंड यांनी केले. सचिव डॉ. आसिफ तांबोळी व वूमन्स फोरम चेअरपर्सन डॉ. सौ.सुनयना भुजबळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अध्यक्ष डॉ.प्रकाश पुंड यांनी दोन वर्षे सहकार्य केल्याबद्दल डॉक्टरवृंदांचे व सचिव डॉ. आसिफ तांबोळी यांचेही आभार मानले. यावेळी डॉ. पुंड यांनी पुढील वर्षासाठी डॉ. आसिफ तांबोळी यांची अध्यक्षपदासाठी सूचना केली. त्याला सर्व डॉक्टरांनी टाळ्यांचा गजरात अनुमोदन दिले. डॉ.अशोक निरगुडे यांनी एमपीएच्या कार्याचा आढावा सादर करत हेच कार्य यापुढेही उत्तम चालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ.तांबोळी यांनी सेक्रेटरीपदी डॉ. धनंजय पाटील, सहसेक्रेटरीपदी डॉ. शेखर ठाणगे, खजिनदारपदी डॉ. महेंद्र गाडेकर आणि वूमन फोरमवर डॉ. संगीता सरोदे यांची निवड घोषित केली.
डॉ. राजेंद्र अमृतकर यांचे सहकार्याबद्दल कौतुकही करण्यात आले. ज्येष्ठ डॉ. मामा सहस्रबुद्धे, डॉ. धनंजय पेखळे आदींचाही सन्मान करण्यात आला. यावेळी एमपीएचे मावळते खजिनदार डॉ. प्रमोद पाटील, सहसचिव डॉ.संतोष धात्रक हेही उपस्थित होते.
सदस्य डॉ. समीर लासुरे, डॉ. लियाकत नामोले, डॉ. सचिन खुर्दळ, डॉ. नितीन म्हस्के, डॉ. चंद्रकांत बोरसे, डॉ. लअरिफ शेख, डॉ. रवींद्र कुटे, डॉ. अमित विसपुते, डॉ. धनंजय पाटील, डॉ.दीपक सरोदे, डॉ.सुरेश आहेर, डॉ.वंदना आहेर, डॉ.स्मिता ठाणगे, डॉ.शैलेश पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नांदेडकर, डॉ. निखिल आडके, डॉ.संदीप भवर, डॉ.नितीन बुवा, डॉ.अनिल भावसार, डॉ. नावेद खान, डॉ. विराज दाणी, डॉ. बाळासाहेब मोकळ,डॉ. प्रसाद संधान,डॉ. राजेंद्र व डॉ. राजश्री हरक डॉ. विजय व डॉ. सौ गवळी, डॉ. उमेश नगरकर, डॉ. महेश भालेराव, डॉ. सपना मते, डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. रवींद्र कहांडळ आदी उपस्थित होते.