नाशिक

नाट्यपरिषदेचे पुरस्कार जाहीर

नाट्यपरिषदेचे पुरस्कार जाहीर
नाशिक :प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेतर्फे दिले जाणारे यंदाचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाले  आहेत. रंगभूमी दिनाच्या निमित्ताने रंगभूमीवर विविध माध्यमातून योगदान देणाऱ्या कलावंताना पुरस्कार देण्यात येतात. यंदा   अभिनयासाठी दिला जाणारा दत्ता भट स्मृती पुरस्कार सुनील ढगे, शांता जोग स्मृती पुरस्कार अनिता दाते यांना, लेखनासाठीचा नेताजी  दादा भोईर पुरस्कार रविंद्र कटारे , तर दिग्दर्शनासाठीचा प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार सचिन शिंदे  यांना जाहीर झाला आहे.रविवार  (दि. ५) रंगभूमी दिनानिमित कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी 5:30  ला पुरस्काराचे वितरण पालकमंत्री दादा भूसे  आणि मनपा आयुक्त   डाॅ.अशोक करंजकर , रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ अध्यक्ष  मुंबई  तथा नियामक मंडळ सदस्य, मध्यवर्ती मुंबई विजय गोखले
यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती  (दि.31) रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. रवींद्र  कदम , सुनील ढगे, ईश्वर जगताप, विजय शिंगणे, राजेश भुसारे  यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थींची निश्चिती केली. दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह असे आहे. यावेळी कार्यवाहक सुनील ढगे, खजिनदार ईश्वर जगताप,  सहकार्यवाह राजेश भुसारे आदी उपस्थित होते.

रंगतपस्या पुरस्कार
रंगतपस्या पुरस्कार विजय मंडळ सुरेश भोईर यांच्यावतीने दिला जाणार आहे. यंदा या पुरस्काराचे प्रथम वर्ष आहे
. या पुरस्काराचे स्वरूप 11 हजार रूपये आणि स्मृतिचिन्ह  असणार आहे. रंगभूमीवरील योगदानासाठी उदन्मयुग कलावंताना हा पुरस्कार  देण्यात येणार आहे. हा पुरस्कार दर दोन वर्षानी कानेटकर शिरवाडकर पुरस्कारावेळी देण्यात येणार आहे.यंदा प्रथम वर्ष असल्याने नाट्य परिषदेच्या पुरस्कार वितरण प्रसंगी पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

 

हे आहेत पुरस्कारांचे मानकरी

 

दत्ता भट पुरस्कार (पुरस्कृत अभिनेये प्रशांत दामले) (अभिनय- पुरुष) –    सुनील ढगे

शांता जोग स्मृती पुरस्कार ( पुरस्कृत -डाॅ .अनिरुद्ध धर्माधिकारी) (अभिनय-स्त्री)- अनिता दाते

प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार -(पुरस्कृत हेमंत टकले (दिग्दर्शन)-सचिन शिंदे

नेताजी तथा दादा भोईर पुरस्कार(पुरस्कृत सुरेश भोईर)(लेखन)- रविंद्र कटारे

पुरोहित स्मृती पुरस्कार (पुरस्कृत गिरीश सहदेव)(बालरंगभूमी)-प्रा. विजय कुमावत

जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (पुरस्कृत चारूदत्त दिक्षित)  (सांस्कृतिक पत्रकारिता) – पियुष नाशिककर

डाॅ.रामदास बरकले स्मृती पुरस्कार ( पुरस्कृत प्रा. हेमंत बरकले)(लोककला) – श्रीकांत गायकवाड

शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार(पुरस्कृत श्रीकांत बेणी)(शाहीर पुरस्कार) – शाहीर शंकर जाधव

विजय तिडके स्मृती पुरस्कार( पुरस्कृत संकेत तिडके) (रंगकर्मी कार्यकर्ता) – राजेश जाधव

सुमन माटे स्मृती पुरस्कार (पुरस्कृत चारूदत्त दिक्षित) (पार्श्वसंगीत)-आनंद ओक

गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार (पुरस्कृत  डाॅ.स्वप्निल तोरणे)(प्रकाशयोजना )- प्रफुल्ल  दिक्षीत

रंगतपस्या पुरस्कार (पुरस्कृत -सुरेश भोईर विजय  नाट्य मंडळ)- महेश डोकाफोडे

विशेष योगदान – अमित कुलकर्णी  (सांस्कृतिक)
विशेष योगदान – डाॅ.शेफाली भुजबळ (शैक्षणिक)
विशेष योगदान -प्रशांत खरोटे (प्रेस फोटोग्राफी )
विशेष योगदान -भाग्यश्री काळे (नाट्य कारकीर्द)

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago