नाशिक स्मार्ट सिटीला नॅशनल डिजिटल ट्रान्सफाॅरमेशन पुरस्कार 

 

आसामा :  नाशिक स्मार्ट सिटीला 8 वा नॅशनल डिजिटल ट्रान्सफाॅरमेशन पुरस्कार मिळाला आहे. गो -कनेक्ट अंतर्गत 8 वि नॅशनल डिजिटल ट्रान्सफाॅरमेशन पुरस्कार 2022 या
 कार्यक्रमाचे आयोजन हे गुवाहाटी, आसाम येथे 9 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. या अंतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कार्यालयास usage of ICT implementation in smart cities या श्रेणी अंतर्गत Award of excellence पुरस्कार देण्यात आला आहे. भारतभरातून सर्व शहरे तसेच शासकीय व निमशासकीय संस्था यांनी या पुरस्कारासाठी नामांकन अर्ज मागविण्यात आले होते.
यामध्ये नाशिक स्मार्ट सिटीला स्मार्ट ब्रिज सर्व्हायवलंस सिस्टीम या पायलट प्रकल्पासाठी पुरस्कार मिळाला. हा प्रकल्प प्रूफ ऑफ कन्सेप्ट (POC) नुसार एक वर्षाच्या कालावधीसाठी नाशिक मधील 120 वर्षांपूर्वी गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या सर्वात जुन्या पुलांपैकी एक असलेल्या अहिल्याबाई होळकर पुलावर राबविण्यात आला होता. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट इंटिग्रेटेड कंट्रोल कमांड सेंटर (ICCC) मधील विद्यमान पायाभूत सुविधांचा वापर करून तसेच इनक्लिनोमीटर, तापमान आणि आर्द्रता सेन्सर्स वापरून होळकर पुलाचे संरचनात्मक पातळीचे निरीक्षण करणे, थेट रहदारीची घनता आणि पुलाची दृश्य पडताळणी होते. स्मार्ट ब्रिज सर्व्हिलन्स सिस्टम (SBSS) या प्रकल्पात तंत्रज्ञानाचा वापर करून, कोणत्याही प्रकारच्या संरचनेची तपासणी केली जाऊ शकते.
हा पुरस्कार संपूर्ण भारतातील एकूण 100 स्मार्ट शहरांपैकी नाशिक स्मार्ट सिटी आणि लुधियाना स्मार्ट सिटी या शहरांना मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *