कालिदास नाट्यगृहाच्या दरासंदर्भात नाट्यपरिषदेचे पालकमंत्र्यांना निवेदन


नाशिक : प्रतिनिधी
कालिदाद कलामंदिर नाट्यगृहाच्या दरासंदर्भात सवलत देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा नाशिक यांच्यावतीने पालकमंत्री दादा भूसे यांना देण्यात आले. यावेळी नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ.अनिरूध्द धर्माधिकारी आणि प्रमुख कार्यवाहक सुनील ढगे ऊपस्थित होते.
निवेदनात अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने आयोजित शिरवाडकर, कानेटकर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कालिदास कलामंदिर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच 500 रूपये तिकीट दर असलेल्या नाटकासाठी एक दर तर 500 रूपये च्या पुढे तिकीट दर असलेल्या नाटकासाठी अधिक दर असे ठरवण्यात आले होते. मात्र नियमावलीनुसार 499 रूपये आणि ते ही फक्त पहिल्या चार रांगापर्यंत असा अर्थ निघत आहे. या नियमामुळे नाट्यगृहासाठी भरलेली अनामत रक्कम मिळाली नाही., प्रशासनाने सत्राची वेळ बदलली मात्र काही कारणास्तव नाटक सुटण्यास नियोजित वेळेपेक्षा थोडा विलंब झाल्यास प्रयोगाची अनामत रक्कम राखून ठेवण्यात येते.,दहा ते पंधरा मिनीटे नाटकास विलंब झाल्यास दंड आकरण्यात येतो. कलामंदिरचे तिमाही आरक्षण करताना प्रत्येक प्रयोग निश्‍चित नसतो. ठरलेला प्रयोग चार सहा दिवसांपूर्वी रद्द होतो आणि त्या ऐवजी दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम ठरवावा लागतो. त्यावेळी नियमाप्रमाणे भाडे दरातील फरक कार्यक्रम आधीच भरतो. त्यामुळे गरज पडल्यास कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार भाडे फरक भरण्यास अनुमती असावी. ,शासनाकडून कोरोना कालावधीपासून मनोरंजानाच्या कार्यक्रमासाठी 50 टक्के सवलत कायम ठेवण्यात आलेली आहे. ही सवलत कालिदास कलामंदिरसाठी लागू करावी, तसेच ऑर्क्टेस्ट्राचे भाडे हे नाटकाच्या वर्गवारी प्रमाणे आकारावे,कालिदास कलामंदिर येथील उपहारगृह सुरू करावे,नाट्यगृहाची स्वच्छता राखण्यात यावी,अशा मागण्यांचे करणारे निवेदन पालकमंत्री दादा भूसे यांना देण्यात आले.
याआधी डिसेंबरमहिन्यात महिन्यात ना. उदय सामंत अभिनेते प्रशांत दामले यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी आले असता त्यांच्याकडे कालिदासच्या दरासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी आयुक्तांना फोन लावत यासंदर्भात तोडगा काढावा असे सांगितले होते त्यावेळी आयुक्तांनी नाटयपरिषदेच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेत त्यांचे निवेदन स्विकारत कालिदास संदर्भातील प्रश्‍न मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. मात्र अद्याप कालिदास कलामंदिर संदर्भातील विविध प्रश्‍न प्रलंबित असून पालकमंत्री दादा भूसे यावर मार्ग काढणार का हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *