नाशिक : प्रतिनिधी
महिलांमध्ये उपजतच कलागुण असतात. कुटुंंब सांभाळत असताना स्वत:ला नोकरी करत सिद्ध करणे कठीण असते. मात्र, जगातील सर्वांत अवघड जॉब गृहिणींचा असतो. कारण ती चोवीस तास कामातच असते. कुटुंबासाठी झटताना स्वतःकडे महिला लक्ष देत नाहीत, मात्र अशा
स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाल्यास स्वत:ला सिद्ध करत असतात. एकाच वेळी अनेक कामे योग्यरीतीने करण्याचे कसब महिलांमध्ये असते. महिलांचा नवरात्रीच्या निमित्तानेच नाही तर इतर वेळीही सन्मान करायला हवा, असे मनोगत पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी व्यक्त केले. नवरात्रोत्सवानिमित्त दैनिक गांवकरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवरंगोत्सवातील 54 भाग्यवान महिलांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. मुंदडा साडी निकेतन, निफाड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, निफाड, छ. द. भावसार सराफ, आर. एस. ट्रॅक्टर हाऊस, गजानन एन्टरप्रायजेस मांजरगाव, आदर्श माँटेसरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांनी प्रायोजित केलेल्या आणि पंचवटी लायन्स क्लबच्या सहकार्याने पार पडलेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवारी (दि.15) लायन्स क्लब हॉल येथे पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्वाती जाधव, सावानाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, आर. एस. ट्रॅक्टर हाऊसच्या संचालक स्मिता सोनवणे, मुंदडा साडीचे नयन मुंदडा, ज्योती मुंदडा, अरविंद राठी, जयश्री राठी, पंचवटी लायन्स क्लबच्या अध्यक्षा रितू चौधरी, नीलिमा जाधव, दै. गांवकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत, उपसंपादक गोरख काळे, उपसंपादक देवयानी सोनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंपादक अश्विनी पांडे यांनी केले. तर सूत्रसंचालन उपसंपादक के. के. अहिरे यांनी केले. आभार उपसंपादक चंद्रमणी पटाईत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाहिद बागवान, समाधान रोकडे, ग्रेसी वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
पिवळा1 छाया पुंडे, नाशिक
2 कविता हिरे, चाटोरी
3 श्रीमती तुपे, शिंदे गाव
4 डॉ. अश्विनी दाते, ध्रुवनगर
5 मनुजा गायकवाड, रासबिहारी
6 चेतना सेवक, पंचवटी
हिरवा
1 प्रतिभा बाचकर, दीपालीनगर
2 अमृता चव्हाण, नाशिक
3 ज्योती जॉर्ज, देवळाली कॅम्प
4 पायल मोरे, सायखेडा
5 कीर्ती वर्मा, पाथर्डी फाटा
6 शिखा जैन, अशोकस्तंभ
राखाडी
1 नलिनी गांगुर्डे, आंबेवणी
2 प्रीती शिंदे
3 मंजुषा चव्हाण, पंचवटी
4 चांदणी भंडारी, नाशिक
5 स्वाती पवार, गोविंदनगर
6 त्रिवेणी वाघ, ध्रुवनगर
नारंगी
1 गायत्री जाधव, गंगापूररोड
2 कांचन शिंदे, उत्तमनगर
3 कल्पना पंडित, टाकळी रोड
4 अर्पिता गुंजाळ, नाशिकरोड
5 मोनाली तिकुटे, विल्होळी
6 सविता मारू, नाशिक
सफेद
1 रिंकू पाटील, शिवाजीनगर
2 संध्या गांगुर्डे, नाशिकरोड
3 रूपाली ढोकणे, सिडको
4 भावना नागपुरे, सिडको
5 प्रियांका गोस्वामी, जेलरोड
6 ज्योती घुगे, गंगापूररोड
लाल
1 प्रियांका रणमळे, सिन्नर
2 सागरिका निकम, नाशिक
3 दिव्यांनी पवार, नाशिक
4 अनुसया गांगुर्डे, लहवित
5 तेजस्वी छलारे, जेलरोड
6 सुरेखा आहेर, तिडके कॉलनी
1 वृषाली अमृतकर
2 मोनाली हारदे
3 गीतांजली सोनवणे, गंगापूररोड
4 अर्चना नाटे, चांदोरी
5 पुष्पा अडागळे, द्वारका
6 संगीता महाजन, सिडको
गुलाबी
1 रूपाली जाधव, सटाणा
2 शीतल निकम, वनसगाव
3 पूनम वाणी, कर्मयोगीनगर
4 सुरभी कासठ, सिन्नर
5 अर्चना जोगड, नाशिक
6 सीमा ताडगे, कॅनडा कॉर्नर
जांभळा
1 कामिनी निकुंभ, जेलरोड
2 पूनम शेजवळ, नाशिकरोड
3 कविता विसावे, नाशिक
4 अंजली चांडोले, नाशिकरोड
5 मीरा सुमरा, डीजीपीनगर
6 दर्शना अहिरे, पंचवटी