निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी भवन येथे आनंदोत्सव साजरा

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी भवन येथे आनंदोत्सव साजरा
नाशिक : प्रतिनिधी

– केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असून पक्षाचे नाव व चिन्ह त्यांचे असल्याचा निकाल दिल्याने नाशिक येथील राष्ट्रवादी भवन येथे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटक्यांची आतिषबाजी व पेढे वाटप करून ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरत जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला शहाराध्यक्षा योगिता आहेर, सामाजिक न्याय प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, युवक जिल्हाध्यक्ष चेतन कासव उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर नाशिक शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी भवन येथे जमा होऊन ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरत व फटक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी “एकच वादा – अजित दादा”, “महाराष्ट्र की बुलंद आवाज..अजीत पवार” अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे म्हणाले, ” देशातील लोकशाहीप्रमाणे सर्वात जास्त आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व पक्षातील मूळ पदाधिकारी सोबत असणाऱ्याना म्हणजेच राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना पक्षाचे नाव व चिन्ह देण्यात आले आहे. यामुळे नाशिक मधील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह व आनंद आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असून याचा फायदा पक्षास येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात होईल.
यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे म्हणले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या स्थापनेवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, जेष्ठ नेते छगनरावजी भुजबळ सह सर्व जेष्ठ नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांनी पक्षचे चिन्ह व झेंडा याची रचना केली तेच चिन्ह परत मिळाल्याचा आंनद आहे. आम्हाला चिन्ह व नाव मिळाल्याने पक्ष नव्या पिढीच्या हाती आल्याच समाधान आहे त्यामुळे घडयाळ तेच असून वेळ नव्या पिढीची आहे.
याप्रसंगी प्रदेश पदाधिकारी निर्मला सावंत, ऋषिकेश पिंगळे, रोहित पाटील, विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, शंकर मोकळ, प्रशांत वाघ, कविता कर्डक, जगदीश पवार, योगेश दिवे, राजेश भोसले, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, डॉ. संदीप चव्हाण, निलेश भंदुरे, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, संतोष भुजबळ, राहुल पाठक, रेहान शेख, अक्षय परदेशी, पुष्पा राठोड, वैशाली ठाकरे – वायगंकर, रूपाली पठाडे, दीप्ती हीरे, रोहिणी रोकडे, मंगला मोकळ, सुरेखा पठाडे, संगीता पाटील, निर्मला सावंत, मंगला मोरे, अपर्णा खोत, माधुरी एखंडे, अजय पाटील, चैतन्य देशमुख, हरिष महाजन, प्रथमेश पवार, सुशांत काकड, कांबळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *