नवी दिल्ली: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते खा शरद पवार यांना बसला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी चे घड्याळ हे चिन्ह आणि पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बहाल केले आहे, उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनाही हा मोठा धक्का मानला जात आहे,राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्याने दोन्ही गटाने पक्ष आणि चिन्ह यावर दावा केला होता. निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली होती, त्यामुळे निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून होतं, आज निवडणूक आयोगाने निकाल दिला, या निकालाने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे