इगतपुरी नगरपरिषदेत राष्ट्रवादीची जोरदार तयारी

इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा सत्तापरिवर्तन करण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यांनी स्थानिक विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक गरजा आणि संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 हा सर्वार्ंत मोठा वॉर्ड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांच्या समस्या सुटल्याच नसल्याने यंदाच्या निवडणुकीच्या आधीच माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यांनी या प्रभागात आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून सर्व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभागातील रस्ते, भूमिगत गटारीचा प्रश्न मार्गी लावले आहेत. प्रत्यक्षात कामेदेखील सुरू झाली आहेत. माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष उमेदवारांसह सर्वच दहा प्रभागांत उमेदवार उभे करणार आहे. शहराचा विकास होण्यासाठी मंत्रालयातून अनेक योजना राबविल्या जाणार आहेक. निधी उपलब्ध करून नागरिकांच्या समस्या सोडविणार आहे.

 

                                                             आशाताई थोरात

                                                             मयुरी पुरोहित

या आहेत समस्या

– प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेल्या आठ वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. – गटारी उघड्यावर असल्याने स्वच्छताच केली नाही.
– परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो.

प्रभागात होणारी विकासकामे

– नवीन मच्छी मार्केट व मटण मार्केट बांधण्यासाठी 50 लाख रुपये मंजूर.
– प्रभागात व्यायामशाळा बांधण्यासाठी 30 लाख रुपये मंजूर.
– प्रभागातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार असून, काही भागांत कामेदेखील सुरू झाली आहेत..

संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा ही आपली ताकद

इगतपुरीतील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवाराना संधी द्यावी. पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे कामाला लागतील, असा निर्धार करण्यात आला. संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह आणि निष्ठा हीच आपली खरी ताकद आहे, यावर पुन्हा एकदा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

निसर्गाने इगतपुरी शहराला विशेष वरदान दिले आहे. त्यामुळे राज्यभरातून व इतर राज्यांतील पर्यटक मोठ्या प्रमाणात
इगतपुरीत येत असतात. त्यांच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा व शहरातील व्यापार, उद्योग वाढविण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून नवीन व्हिजन करणार आहे. शहरातील महिलावर्गाला यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिक युवकांसाठी उद्योगाची उभारणी करण्यात येणार आहे.
– फिरोज पठाण, माजी उपनगराध्यक्ष

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *