नाशिक : प्रतिनिधी
नाशकातून देशात नियमित आणि विनाखंड विमान वाहतूक सुरु राहावी तसेच विदेशातही ही सेवा सुरू करण्याच्यादृष्टीने संबंधित सर्व यंत्रणा आणि संघटनांनी एकजुटीने प्रयत्न करावे तसेच त्यासाठी नाशिकचे ब्रँडिंग करावे,असे आवाहन आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केले.
नाशकात विमानसेवा पुरविणार्या कंपन्यांसोबत यासेवेचे व्यापक जाळे येथे विणले जावे तसेच नाशकातून दिल्ली,मुंबई, हैदराबाद,चेन्नई, तिरुपती,अहमदाबाद,गोवा,नागपूर व अन्य शहरांशी एअर कनेक्टिव्हिटी कायमस्वरूपी व विनाखंड सुरू राहावी या संदर्भात फेब्रुवारीत बैठक होणार असून त्यात सादर करावयाच्या रोडमॅप संदर्भात चर्चा करण्यास विविध औद्योगिक आणि संलग्न संघटनांच्या पदाधिकारी आणि प्रतिनिधींची बैठक आयामाचयस रिक्रिएशन सेंटर येथे पार पडली त्यावेळी मार्गदर्शन करतांना निखिल पांचाळ बोलत होते.
निमाचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे,तानचे सागर वाघचौरे, मनोज वासवानी,क्रेडाईचे सचिन चव्हाण, कुणाल पाटील,नीटाचे ऋषिकेश वडाळकर नाशिक सिटीझन फोरमचे सचिन अहिरराव,चेंबरचे संजय सोनवणे,आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे,सहसचिव गोविन्द झा, खजिनदार राजेंद्र कोठावदे,एव्हीएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावळ, ज्ञानेश देशपांडे, संदीप देसले, अमित कुलकर्णी आदी व्यासपीठावर होते.
नाशिकहून पूर्ण क्षमतेने देश आणि विदेशात विमानसेवेचे व्यापक जाळे विणले जावे यासाठी सर्व संघटनांनी,नागरिकांनी, तसेच व्यावसायिकांनी त्याचे ब्रँडिंग करावे,ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून त्याची व्यापक प्रसिद्धी करावी.लोकांना विमानतळावर विनाविलंब आणि वेळेत पोहोचता यावेत यासाठी शहराच्या कानाकोपर्यातून बससेवेचे जाळेही विणले जावेत,असेही निखिल पांचाळ यांनी सांगितले.
विमान कंपन्यानी उत्तम सेवा दिल्यास नाशकातील सर्व संघटना त्या कंपन्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करतील,असे मत निमाचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केले.
सहायक पोलिस निरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याने गुन्हा नाशिक: प्रतिनिधी गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात…
मनमाड रेल्वे स्थानक हरवले...? मनमाड(आमिन शेख):- मनमाड रेल्वे स्थानक हरवले वाचून आश्चर्य वाटले हो तशीच…
ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…