नाशिकमध्ये नवीन 3 पोलीस अधिकारी

पोलीस अकादमीच्या अधीक्षकपदी
गायकवाड, ज्योती क्षीरसागर
नागरी हक्कच्या अधीक्षकपदी साळी
नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाने काल  अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून, पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकार्‍यांना नियुक्ती देण्यात आली आहे. नाशिकला नव्याने तीन अधिकारी दाखल झाले असून, पोलीस अकादमीच्या अधीक्षकपदी विशाल गायकवाड, ज्योती क्षीरसागर तर नागरी हक्क संरक्षणच्या पोलीस अधीक्षकपदी  अमरावती येथील पोलीस उपायुक्त विक्रम महादेव साळी  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने 19 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी हे आदेश जारी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *