मुंबई:
पंतप्रधानांच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेअंतर्गत महिलांच्या मदतीसाठी ‘१८१’ हा नवा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार आहे.
येत्या पंधरा दिवसात महिलांच्या मदतीसाठी हा क्रमांक कार्यरत होणार आहे. महिलांवर होणाऱ्या हिंसाचारासंबंधी तक्रारी असल्यास या क्रमांकावर संपर्क साधत मदत मिळवता येणार आहे.