नाशिक : अभय पांडे
सध्या सोशल मीडियावर थ्रीडी मॉडेल तयार करणे हा ट्रेंड प्रचंड प्रमाणात पसरला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिकलॉकसह इतर प्लॅटफॉर्मवर तरुण पिढी या नव्या ट्रेंडमध्ये मोठ्या प्रमाणात रुची दाखवत आहे.
साध्या फोटोंना किंवा व्हिडिओंना थ्रीडीमध्ये रूपांतरित केले जाते. जे खूप आकर्षक आणि रिअॅलिस्टिक दिसते. विशेषतः, या ट्रेंडमुळे डिजिटल कला आणि थ्रीडी डिझायनिंगमध्ये तरुणांचे कलाकौशल्य वाढत आहे. अनेक तरुण फ्रीलान्स प्रोजेक्ट्स आणि ऑनलाइन कमाईसाठी या तंत्राचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे मनोरंजन आणि कलात्मक प्रगतीच्या दृष्टीने हा ट्रेंड उपयुक्त ठरत आहे.
पालक आणि शिक्षकांनी या नव्या ट्रेंडसाठी योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे. तरुणांना डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे, सोशल मीडियाच्या आकर्षणात अति-गुंतवणूक टाळणे आणि वास्तविक जीवनातील जबाबदार्या सांभाळणे शिकवणे आवश्यक आहे. सध्या थ्रीडी मॉडेल हा फक्त एक ट्रेंड नसून, तरुणांच्या जीवनशैलीवर आणि त्यांच्या सामाजिक व मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा एक मोठा घटक बनला आहे.
तरुण पिढीवर परिणाम
थ्रीडी मॉडेलिंगमुळे तरुणाईला नवीन क्रिएटिव्ह मार्ग मिळत आहेत. याआधी सोशल मीडिया हे केवळ फोटो-व्हिडिओंपुरते मर्यादित होते, पण आता लोक स्वतःचे थ्रीडी अवतार तयार करून दाखवू लागले आहेत. अनेक तरुण स्वतःच्या आठवणी म्हणून थ्रीडी मॉडेल तयार करून ठेवत आहेत. मित्रमैत्रिणींना गिफ्ट म्हणून थ्रीडी फिगर देण्याची फॅशन वाढत आहे. या ट्रेंडमुळे तरुण पिढीमध्ये डिझायनिंग, गेमिंग, अॅननिमेशन, व्हीएफएक्स आणि आर्किटेक्चर यांसारख्या क्षेत्रांबद्दलची आवड वाढू लागली आहे. रोजगाराच्या नव्या संधी उघडण्याची शक्यता
थ्रीडी मॉडेल कसे तयार करावे?
♦ ब्राउझर उघडा – मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम चालवा. गुगल एआई स्टुडिओ शोधा – सर्च करून ट्राय जमिनी या पर्यायावर क्लिक करा. मॉडेल निवडा – उजव्या पॅनेलमध्ये नानो बानाना निवडा. साइन इन करा – तुमचा गुगल अकाउंट वापरून साइन इन करा. अटी मान्य करा – यूजर अॅग्रीमेंट स्वीकारा. फोटो अपलोड करा – रन बटनाच्या जवळील + क्लिक करा आणि अपलोड इमेज/फाइल निवडा. तुम्ही सेल्फी, पाळीव प्राणी किंवा निसर्गदृश्य फोटो वापरू शकता. थ्रीडी मॉडेल कमांड वापरा – फोटो अपलोड केल्यानंतर दिलेला प्रॉम्प्ट कॉपी करा आणि चॅटबॉक्समध्ये पेस्ट करून रन बटन क्लिक करा. याप्रमाणे तुमचा फोटो वापरून थ्रीडी मॉडेल तयार होईल.