नाशिक महापालिकेसाठी नव्याने प्रभाग रचना 

 

नगर विकास विभागाचा निर्णय

नाशिक : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसंदर्भात नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश नगर विकास विभागाने काढले आहे. त्यामुळे आता नाशिक महापालिकेसाठी यापूर्वीची तीन प्रभाग सदसीय रचना आता रद्द होणार आहे. दरम्यान या निर्णयाने शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारला धक्का दिल्याचे बोलले जात आहे. तीन सदस्य रचनेला शिंदे सरकारचा विरोध होता.

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह १७ महानगरपालिकांची मुदत संपुष्टात आली असून मागील एक वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना तीनची प्रभागरचना पूर्ण झाली होती. तसेच लोकसंख्येनूसार सदस्य संख्याही वाढविण्यात आली होती. मात्र, राज्यात संत्तातर होताच शिंदे व फडणवीस सरकारने तीनची प्रभागरचना निर्णय रद्द केला होता. तसेच हा मुद्दा पुढे न्यायप्रविष्ठ झाला .दरम्यान मंगळवारी नगरविकास विभागाने मुदत संपलेल्या व आगामी काळात मुदत संपणार्‍या महापालिकांची प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. या निर्णायामध्ये स्पष्टता नसल्याने प्रशासनासह राजकीय पक्षांमध्ये संभ्रवस्था वाढली आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मुदत संपलेला व भविष्यात ज्या महापालिकांची मुदत संपत आहे त्यांची प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तयार केलेली तीनची जुनी प्रभागरचना कायम ठेवायची की नव्याने फेररचना करायची याबाबत संभ्रम आणखी वाढला आहे.  हे पाहणं खूप महत्वाचं होणार आहे. याचा मोठा परिणाम मुंबई महानगरपालिकेसह इतर पालिकांवरही पडू शकतो.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *