निगराणी एक अनन्य प्रवास

*निगराणी एक अनन्य प्रवास*
एक आई सतत आपल्या लेकरासाठी प्रयत्नशील असते. ती कधीच हार मानत नाही. प्रश्न जेव्हा लेकरांवर येतो ना  तेंव्हा ती नवदुर्गा ही होते. अशाच एका आईनं आपल्या लेकरासाठी घेतलेल्या उत्तुंग भरारी ची ही खरी कथा आहे. त्यांच नाव *सौ. सुनिता राम महाले*  निगराणी (विशेष शाळा) संस्था मनमाड.
सर्व सामान्य मुलांप्रमाणे नितीनची प्रगती दिसत नव्हती. तीन वर्षे झाली तरी सर्व गोष्टींना उशीर होत होता. जसे की बसणं,चालण,बोलणं इ. दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर काही तपासण्या अंती अगदी कमी प्रमाणात तो मतिमंद असल्याचं तज्ञांनी सांगितले. पुणे मुंबई अशा ठिकाणच्या मोठ्या दवाखान्यात औषध उपचार घेऊनही काही जास्त फरक पडत नव्हता.  शारिरीक उपचार पद्धती चालु केल्यावरच बदल लक्षात आला पण मनमाडला वास्तव्यास असल्यामुळे त्यातही सातत्य हवे होते. नाशिकच्या विशेष शाळेमध्ये प्रवेश घेतला पण तिथे नितीन पेक्षा खुपचं मोठी मुले होती. तो घाबरत होता. हे जितकं त्याच्यासाठी अवघड होते त्यापेक्षा ही आई म्हणुन सौ. सुनिता ताईंसाठी पण अतिशय अवघड होते. कारण ही आई मुलाची ताटातूटच होती. आपल्या चिमुकल्याला त्यांनी कुठे त्यांच्या पासुन दुर ठेवलेच नव्हते.‍ शेवटी अवस्था न पाहिल्या गेल्यामुळे त्या शाळेतुन प्रवेश रद्द केला आणि मनमाडला उपचार चालू केले. त्यातच त्यांची ओळख प्रबोधिनी संस्थेच्या रजनीताई लिमये यांच्याशी झाली. ह्या पण विशेष मुलाची आई आहेत आणि महाराष्ट्रातील पहिली विशेष मुलांची शाळा यांनी स्थापन केली आहे. सुनिता ताई यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आधारासाठी जाउ लागल्या. इतका व्याप रजनीताईना सांभळताना पाहुन सुनिता ताई थक्क व्हायच्या. कारण आपण आपल्या मुलाला सांभाळताना ची  कसरत त्यांना माहित होती. शेवटी एक  *सम दुःखी आईच दुसऱ्या आईला*  समजून घेऊ शकते. प्रश्न लेकराच्या प्रगतीचा हिताचा येतो ना तेव्हा स्त्री फक्त आईच नाही तर *नवदुर्गा प्रमाण नवरुप* ही घेत असते. वेळप्रसंगी विविध रुपे जसे की निडरता, धाडस, धैर्य, सहनशीलता असे अनेक रुपे आपल्या लेकराच्या हितासाठी आई घेत असते. सुनिताताईंनी मग विशेष डीएड करण्याचा निर्णय घेतला तोही वयाच्या पस्तीशीत…. *रामायणातील रामानं तरी सीतेची साथ सोडली पण सुनिता ताईंचे पती राम त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले आहेत आजपर्यंत…..*  आपला प्रश्न सुटण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात पण समाजात अशा बालकांना ही सर्व सुविधा मिळावं म्हणून त्यांच आतड तुटत होतं. आणि म्हणूनच हा निर्णय त्यांनी घेतला. आता दरम्यान त्यांना त्यांच्या जाऊबाई उल्लेख करणं खरं तर हा चुकीचं ठरेल पण तरीही  *जाऊबाईच्या रुपात बहिण मैत्रीणच* मिळाली. विशेष डीएडसाठी त्या घराबाहेर पडताना घरची आणि मुलांची जबाबदारी पती राम आणि जाऊ बाईंनी सांभाळली. आणि एका नव्या *अनन्य प्रवासाची* सुरुवात झाली. महाविद्यालयांमध्ये ही त्यांनी सर्वांना आपलेसे केले. सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा प्रचंड इच्छाशक्तीचा आदर वाटत होता. इतक्या वर्षांनी त्यांनी आपल्या चिमुकल्यासाठी निर्णयावर त्यांना सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी समजुन घेत होते आणि काही अडचण आल्यास मदत करत होते. त्यांनी उचललेल्या या धाडसी पावलाच सर्वत्र कौतुक होत होते. आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या विद्यार्थ्यांना ही त्यांच्या कडून *उत्साह, प्रेरणा*  मिळत होती. अथक परिश्रमाने त्यांनी विशेष डीएड ही पदवी मिळवली. खेड्यातील लोक विशेष मुलांकडे दुर्लक्ष करतात काय तर त्यांना काय भविष्य असतं… आजही खेड्यातील लोक हा विषयच गांभीर्याने घेत नाही. या मुलांना मायेची गरज असते हे ही त्यांच्या लक्षात येत नाही. सुनिता ताईंनी मनमाड या भागातील सर्वेक्षण केले आणि जवळपास दीडशे मुलं त्यांना मिळाली. आपल्या अडचणीसाठी तर सगळेच लढताना दिसतात पण समाजातील आपल्या सारख्या *समदुःखी व्यक्तींसाठीही काही करण्यासाठी हृदयात भगवंताचा वास* असावा लागतो. या मुलांना ही सन्मानानं समाजात कुटुंबात जगता याव म्हणून त्यांनी *निगराणी* या विशेष शाळाची स्थापना केली. स्वावलंबनाचे शिक्षण देत असताना मुलांना त्यांच्या मायेचा आधार ही मिळतो. या शाळेचा सगळा खर्च हा पालकांच्या देणगीतून तर काही वेळा स्वतःच्या पदराला चिमटा काढून चालु आहे. या शाळेला सरकारची मान्यता नाही. ज्या लोकांकडे सर्व असुनही ते समाधानी नसतात. कारण खरा आनंद कशात हेच त्यांना माहित नाही. खरा आनंद हा छोट्या गोष्टी मध्ये आहे.  छोट्या गोष्टी मध्ये आनंद मिळाला कि मोठा त्रास ही पचवता येतो. यांच्या या उत्तुंग भरारी ची दखल *झी २४तास* यांनी घेतली.आणि २०१२ चा  सौ. सुनिता ताईंना *अनन्य सन्मान २०१२* मिळाला. आपल्या मुला बरोबरच त्यांनी समाजातील इतर विशेष मुलांना स्वावलंबनाचे शिक्षण देण्यात सुनिता ताई यशस्वी झाल्या आहेत. त्यांच्या या कार्यामुळे विशेष मुल असलेलं घर आनंदी झाले आहे. आईचा प्रवास चालूच असतो.. ती फक्त प्रयत्नशील असते. खरचं या शिक्षण मातेला आणि त्यांनी चालु केलेल्या या विशेष शिक्षण यज्ञाला माझा सन्मानानं मनापासून सलाम……
©सौ. श्रध्दा जाधव बोरसे….
Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

7 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

14 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

1 day ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago