निमा पॉवर एक्झिबिशन 2023चे बोधचिन्ह व माहिती पुस्तिकेचे अनावरण
नाशिक:प्रतिनिधी
नाशकात मोठे उद्योग यावेत.आणि इलेक्ट्रिकल उद्योगाचे मोठे हब व्हावे,असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला.
नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक ज्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा करीत आहेत त्या निमा पॉवर एक्झिबिशनचे 19 ते 22 मे दरम्यान आयोजन करण्यात आले असून त्याची उद्दघोषणा तसेच बोधचिन्ह आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन निमा हाऊस येथे सोमवारी गमे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
व्यासपीठावर महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर,निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सचिव राजेंद्र अहिरे,निमा पॉवर कमिटीचे चेअरमन मिलिंद राजपुत्र,विद्युत निरीक्षक भागवत उगले आदी होते.
पायाभूत सुविधा पुरविल्या तर औद्योगिक विकास होतो.उद्योग क्षेत्रात अव्वल क्रमांक टिकविण्यासाठी आयटी उद्योग मोठ्याप्रमाणात यावेत आणि त्यासाठी मोठ्या जागेची गरज आहे.
शाश्वत औद्योगिक विकास करताना उपलब्ध पाण्याचे नियोजन गरजेचे आहे.नाशिक- पुणे रेल्वेचे भूसंपादन तातडीने करण्यास गती मिळाली आहे.सुरात-चेन्नई महामार्गाच्या भू संपदानलाही वेग आला आहे.कुंभमेळ्याचे नियोजन सुरू आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पात ग्रीन फिल्डमध्ये प्रदर्शन केंद्रासाठी भव्य जागा आणि अन्य बाबींचा अंतर्भाव होता याची आठवणही गमे यांनी करून दिली.रोजगार देणारे स्टार्टअप निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतांना निमा पॉवर नाशिकच्या उद्योगाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रदर्शन भव्य दिव्य व्हावे.सर्वाना रास्त दराने वीज कनेक्शन मिळेल अशी शुभ सकाळ यावी.ऊर्जा अभियंता इलेक्ट्रिक क्षेत्राला अंत नाही.यापुढील युग पॉवर क्षेत्राचे असेल,असा विश्वास महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी व्यक्त केला.
नाशिकचा विकासदर आणि वीज ग्राहकांची संख्या अधिक आहे.ऊर्जा,उद्योग व कामगार हे घटक महत्वाचे आहेत.विद्युत उपकरणे याची मोठी यादी आहे.ऊर्जा क्षेत्राला मोठा वाव आहे.मात्र त्याच्या सुरक्षेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. हे प्रदर्शन औद्योगिक कुंभमेळा व्हावा,अशी अपेक्षा विद्युत निरीक्षक भागवत उगले यांनी व्यक्त केली.
निमातर्फे सात वर्षांच्या खंडानंतर प्रथमच आशा प्रकारचे प्रदर्शन होत आहे.2013 व 2016 मध्ये आयोजित निमा पॉवर मुळेच उत्तर महाराष्ट्राला वेगळे महत्व प्राप्त झाले व सीपीआरआयची टेस्टिंग लॅब नाशिकला मिळाली. ऑटोमोबाईल हब बरोबरच आता नाशिक हे इलेक्ट्रिकल हब म्हणूनही नावारूपास आले आहे.त्यामुळेच निमा पॉवर 2023ची उत्सुकता अधिकच ताणली गेल्याचे निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.परदेशी गुंतवणूकदार, कांसुलेट जनरल,विविध नामवंत कंपन्यांचे पर्चेस मॅनेजर,सीईओ,स्वतः मालक यांच्या मार्गदर्शनाने या प्रदर्शनाची रंगत वाढणार व नाशिकमध्ये गुंतवणूकवाढीस व रोजगार निर्मितीस अधिक गती मिळेल असेही बेळे पुढे म्हणाले.नाशिक हे उद्योगाचे नेक्स्ट डेस्टिनेशन व्हावे हे आमचे ध्येय आहे आणि त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे.स्टार्टअप हबद्वारे 500 उद्योजक घडविण्याचा मानसही बेळे यांनी व्यक्त केला.निमा पॉवर चे चेअरमन मिलिंद राजपूत यांनी प्रदर्शनच्या आयोजनाची माहिती दिली.दिल्लीच्या धर्तीवर नाशकात प्रदर्शनासाठी मोठे मैदान हवे, अशी मागणीही त्यांनी केली.
कार्यक्रमास कामगार उपयुक्त विकास माळी, आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ, सरचिटणीस ललित बूब,बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे,निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी,आशिष नहार,शशांक मणेरीकर, खजिनदार विरल ठक्कर,गोविंद झा, डी.जी.जोशी,जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे,राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी,वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे,जितेंद्र आहेर,मनीष रावळ,श्रीकांत पाटील,रवी शामदासानी,एस.के.नायर,सुधीर बडगुजर,सुरेंद्र मिश्रा,सतीश कोठारी,निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, मधुकर ब्राह्मणकर,संजीव नारंग,चेंबरचे संजीव शाह आदी उपस्थित होते.
प्रदर्शनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल बाळासाहेब जाधव,मंगेश काठे,मारुती कुलकर्णी,राजेंद्र वडनेरे,रवींद्र झोपे,विरल ठक्कर,व्यंकटेश मूर्ती,महेकर,आशिष नहार,राजेंद्र व्यास,प्रकाश ब्राह्मणकार,विवेक गोगटे,ज्ञानेश देशपांडे,प्रशांत जोशी,ललित बूब आदींचा सत्कार करण्यात आला.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…