निमाच्या प्रयत्नांना यश, सिन्नर औद्योगिक वसाहतीतील डांबरीकरणाचे काम सुरु
नाशिक : प्रतिनिधी
सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात निमाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा एमआयडीसीच्या मुख्य अधिकार्यासोबतच स्थानिक अधिकार्यांसोबत सुरु होता. मुख्य रस्त्याच्या व अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जवळपास 9 कोटीचा निधी निमाच्या पदाधिकार्यांनी 3 वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली आहे, यामध्ये मुख्य रस्त्यासोबतच वसाहतीतील अंतर्गत रस्त्याचा समावेश आहे.
औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नेहमीच पुढाकार घेऊन उद्योगांच्या समस्यांचे निरसन करण्याच्या दृष्टीने निमाने आजपर्यंत उल्लेखनिय काम केले आहे. भविष्यात सिन्नर औद्योगिक क्षेत्राला अनन्य साधारण महत्व येणार असल्याने उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने अधिकाधिक कामे कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रयत्न निमाच्या माध्यमातून करण्यात येईल असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.
सिन्नर औद्योगिक वसाहतीत 1000 ते 1200 उद्योग आहेत, जवळपास 15 ते 20 हजार उद्योजक, कर्मचारी व कामगार वर्ग या रस्त्यावरून प्रवास करत असतात त्याच बरोबर अनेक मोठे कंटेनर्स व ट्रक्सची रहदारी या रस्त्यावरून असल्यामुळे मुख्य रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम होणे तितकेच महत्वाचे होते. मुख्य रस्त्यासाठी निमाच्या माध्यमातून नियमित अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्यासमवेत पाठपुरावा केल्यानंतर मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी व वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी जवळपास 9 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रत्यक्षात कामास सुरु झाल्यामुळे सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजक समाधान व्यक्त करत आहे.
यावेळी निमाच्या पदाधिकार्यांनी ट्रक्स टर्मिनल, अंतर्गत ड्रेनेज सिस्टिम, मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण व इतर पायभूत समस्यांबाबत लवकरच एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करणार असल्याचे निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले.
यावेळी सिन्नर उपसमितीचे अध्यक्ष संदीप भदाणे, माजी अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, सिन्नर उपसामीचे उपाध्यक्ष सुरेंद्र मिश्रा, निमा हाऊस उपसमितेचे अध्यक्ष राजेंद्र वडनेरे, एस के नायर, किरण वाजे, अरुण चव्हाणके, प्रवीण वाबळे,अजय बाहेती, राहुल नवले, अतुल अग्रवाल, दत्ता ढोबळे, बाबासाहेब हारदे, कृष्णा नाईकवाडी, रतन पडवळ, दत्तात्रय नवले, निलेश काकड, मुकेश देशमुख, शिवाजी आव्हाड, विश्वजीत निकम, उपअभियंता, एमआयडीसी सुधीर चावरकर, सहायक अभियंता मळेकर आदी उद्योजक व अधिकारी उपस्थित होते.
नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…
नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…
चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…
पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको : विशेष प्रतिनिधी सरकार…
लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे…
अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…