निफाड: प्रतिनिधी
ढगाळ हवामान पाऊस दाट धुके अन आता अचानकपणे घसरलेले तपमान यामुळे द्राक्षनगरी निफाड गारठली आहे सोमवार दि १५ रोजी कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रात पारा ६.५ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे
पारा घसरल्याने द्राक्षमण्यांची फुगवण थांबणार आहे याचा प्रतवारीवर परिणाम होतो तर परिपक्व द्राक्षमणी हे तडकण्याचा धोका आहे चालु द्राक्ष हंगाम हा अखेरच्या टप्यात संकटात सापडला असल्याचे सोनेवाडी खुर्द येथील द्राक्ष बागायतदार बाबुराव सानप यांनी दै गांवकरीशी बोलतांना सांगितले