निफाडचा पारा घसरला
@ 8.7
निफाड: प्रतिनिधी
चालु हंगामात निफाड तालुक्यात थंडीने बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रात सोमवार दि 25 रोजी पारा 8.7 अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे
दुष्काळ अवकाळी अन गारपीटीनंतर निफाडच्या द्राक्षशेतीला पुन्हा कडाक्याच्या थंडीमुळे हुडहुडी भरली आहे पारा घसरत असल्याने परिपक्व होत असलेल्या द्राक्षमण्यंची फुगवण थांबणार आहे तर पारा घसरु लागल्याने तयार झालेल्या द्राक्षमालास तडे जाण्याचे धोके वाढले आहे कांदा गहु हरभरा या पिकासाठी वातावरण पोषक आहे मात्र द्राक्षबागायतदार मोठ्या चिंतेत आहेत कारण थंडीत द्राक्षवेलीचे कार्य सुरु राहणेसाठी पांढरी मुळी व पेशींची क्रिया अविरत चालु ठेवायला पहाटेच्या वेळी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे आवश्यक असते मात्र भारनियमनाबरोबरच पालखेड कालव्याकाठी केवळ तीनच तास वीजपुरवठा सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी नाशिक यांनी काढलेला असल्याने आडात आहे पण पोहर्यात आणता येईना अशी अवस्था झाली आहे वाढत्या थंडीमुळे गाव वाडी वस्तीवर शेकोट्याही पेटल्या आहेत
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…
नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…