निफाडचा पारा ४.२ अंशावर
निफाड : प्रतिनिधी
कडक उन्हाचे दिवस सुरु असतांनाच अचानकपणे निफाडचा पारा थेट ४.२ अंशावर घसरल्याची नोंद कुंदेवाडी ता निफाड येथील गहु संशोधन केंद्रात करण्यात आली आहे . गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच आज पहाटे नागरिकांना थंडीचा सामना करावा लागला, वास्तविक मार्च महिना हा उन्हाचा असतो, परंतु यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच नागरिक थंडीचा सामना करत आहेत. त्यामुळे द्राक्ष मण्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.