तत्काळ मदत मिळत असल्याने महिला, युवतींना दिलासा
नाशिक ः देवयानी सोनार
महिला, युवतींची छेडछाड होत असेल तर त्यांना तत्काळ मदत मिळून टवाळखोरांना चाप लावण्यासाठी स्थापन झालेल्या निर्भया पथकाने जुलै 2022 ते 31 जानेवारी या सात महिन्यांत 843 टवाळखोरांवर कारवाईचा दंडुका चालविला. महिलांना संरक्षण देण्यासाठी निर्भया पथके काम करीत आहेत.
पंचवटी, सरकारवाडा, अंबड, आणि नाशिकरोड या चारही विभागात मिसींग झालेल्यांचा शोध घेण्याबरोबरच कलम 112, 117 तसेच 363 या कलमांखाली गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.
शाळा महाविद्यालयांसह शहर आणि उपनगरातील विविध ठिकाणी टवाळखोरांवर निर्भया पथकाच्या कारवाईने चाप बसला आहे. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. मुली,महिलांची छेड काढणे,पाठलाग करणे,मुलींना फूस लावून पळवून नेणे या प्रकारांत निर्भया पथकाने गुन्हेगारांना कायद्याचा बडगा उगारत टवाळखोरीला काही प्रमाणात का होईना परंतु चाप लावला आहे.
महाविद्यालयात छोटया छोट्या कारणांमुळे वाद होतात अशा वेळी निर्भया पथक महाविद्यालयाच्या प्रशासनाशी तसेच विद्यार्थ्याच्या पालकांशी समुपदेशन करुन पालकांना समज देण्यात येते. त्यामुळे समुपदेशनावर भर दिला जातो. मिसिंग किंवा 363(ज्यांचे वय 18 पेक्षा कमी असलेले)घरातून निघून गेलेले मुले.18 वयापेक्षा जास्त असलेली मुले निघून गेले असे मिसिंग समजले जाते.याही गुन्हांमध्ये निर्भया पथक काम करीत आहे.
सद्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. तर 2 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार कलम 144 महाविद्यालयाच्या परिसरात लागू केले आहे. निर्भयापथकाचीही गस्त सुरू राहणार आहे. महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरी करणारे अथवा कॉप्या पुरविणार्यांवर निर्भया पथकाचा वॉच राहणार असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी सांगितले.
अशी होते कारवाई..
हे पथक प्रो ऍक्टीव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई करणारे आणि रिऍक्टीव्ह म्हणजेच तक्रारींवर आधारित कारवाई करण्याचे काम करते. क्यूआर कोड बेस पोलिसिंगचा एक प्लॅन या पथकाकडे देण्यात आला आहे. या पथकाच्यावतीने पहिल्यांदा महिलांची छेडछाड होण्याची शक्यता असणारी ठिकाणे शोधून काढण्यात येतात. त्यामध्ये शाळा, कॉलेजेस, बसस्थानक, बाजारपेठा, हॉस्टेल्स, सिनेमा हॉल, उद्याने या सगळ्यांचा समावेश असतो. निर्भया पथक अशा ठिकाणांची टेहाळणी करुन टवाळखोरांचा शोध घेतला जातो.
पथकांत यांचा सहभाग
निर्भया पथकात प्रत्येक टीममध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाची एक महिला पोलीस अधिकारी असते. त्यांना मदत करण्यासाठी दोन महिला पोलीस हवालदार आणि दोन पुरुष हवालदारही असतात. त्यांची नेमणूक तीन महिन्यांसाठी केली जाते. टीम सोबत स्पाय कॅमेराही असतो.त्याच्या मदतीने छेडछाडीच्या संशयास्पद हालचालींचं चित्रीकरण केले जाते.
अशी मिळवा मदत..
निर्भया पथकास संपर्क साधण्यासाठी महिला 103, 100 किंवा 1091 या टोल फ्री क्रमाकांचा वापर करु शकतात. व्हॉट्स ऍप अथवा झीरींळीरव Aरिि बरोबरच ई-मेल, फेसबुक या सोशल मीडियावरुनही पोलिसांशी संपर्क साधता येईल. तसेच पोस्टकार्ड आणि पत्राद्वारेही जवळच्या पोलीस स्थानकास कळवू शकतात. 103 हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. फेसबुक पेजवरही तक्रार करु शकता.
शहरातील निर्भयाचे कार्यक्षेत्र वाढविण्यात आले आहे. ऍक्टनुसार कारवाई केली जाते. 112,117 केस दाखल करून टवाळखोर सुधारले नाही तर 107 प्रमाणे चॅप्टर केस दाखल केली जाते. अशा केसेसमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे मार्गदर्शन आणि संकल्पनेनुसार निर्भयापथकाचे काम सुरू आहे.
सिध्देश्वर धुमाळ
सहायक पोलिस आयुक्त
निर्भया पथकाने केलेली कारवाई
जुलै 2022 ते 31 जानेवारीपर्यंतची विभागनिहाय आकडेवारी
निर्भयापथक ……. मिसिंग शोध ……टवाळखोर कारवाई …..घरातून निघून गेलेले
पंचवटी विभाग…………..27,,,,,,,,,
सरकारवाडा विभाग………..43…………
अंबड विभाग……………..79……
नाशिक रोड विभाग…………51………..
एकूण…………………….
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…