नितेश पांडे यांचे हृदयविकाराने निधन

नितेश पांडे यांचे हृदयविकाराने निधन

इगतपुरीतील हॉटेल ड्यू ड्रॉपमध्ये झाली घटना

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी नगरपरिषद हद्दीत हॉटेल ड्यू ड्रॉप येते मुक्कामास थांबलेले टीव्ही सिरीयल हिंदीमूवी यांचे रायटर डायरेक्टर, ऍक्टर नितेश पांडे हॉटेलमध्ये कामानिमित्त थांबले होते.मंगळवार रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या रूममध्ये हॉटेल स्टॉपने फोन केले असता त्यांबी व्यक्तीने फोन उचलले नाही ते काही कामात असेल म्हणून वेटरने पुन्हा 11:45 च्या सुमारास रूमच्या फोनवर फोन केला व त्यांच्या खासगी मोबाइल वर फोन केला नितेश पांडे यांनी फोन व मोबाइल उचलला नाही. हॉटेल कर्मचाऱ्याला संशय आल्याने हॉटेल यांनी ही घटना हॉटेल मॅनेजरला सांगितले.

हॉटेल मॅनेजर यांनी दुसऱ्या चावीने सदर रूमचा दरवाजा उघडला असता नितेश पांडे हे त्यांच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळले तेथून त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या सुमारास दाखल करण्यात आले परंतु इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
या घटनेमुळे टीव्ही सिरीयल इंडस्ट्री मुंबई व फिल्म इंडस्ट्री मुंबई यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे नितेश पांडे यांचे वय अंदाजे 52 ते 53 वर्ष असावे इगतपुरी ते स्टोरी रायटिंगसाठी नेहमी येत असतात काल रात्री त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली व हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे पुढील तपास इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांचे कर्मचारी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *