माजी आमदार नितीन भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

– पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली करणार वाटचाल

नाशिक – विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी रविवारी मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे विधान सभेच्या पश्चिम मतदार संघासह मध्य नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील निवडक पदाधिकाऱ्यांनीची बैठक झाली. याप्रसंगी माजी आ. नितीन भोसले यांचा कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश करण्यात आला. भोसले यांच्या समवेत अनुप भोसले, श्रीकांत शिंदे, ब्रिजेश वाणी, युवराज भोसले, सचिन सोनवणे, राजाभाऊ निंबाळते, प्रशांत ठाकरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हा बॅंक माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे आदी उपस्थित होते.
या बैठकीस प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, खा. श्रीनिवास पाटील, खा. फौजिया खान, खा. विद्या चव्हाण, माजी मंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे , युवक अध्यक्ष महेबुब शेख, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे , आ. एकनाथ खडसे, खा. अमोल कोल्हे आदी निवडक पदाधिकारी उपस्थित होते.
—————————————————-

शरद पवार यांना साकडे !

माजी आमदार नितीन भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेताना राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले. नार-पार, दमण गंगेचे पाणी उत्तर महाराष्ट्राला मिळावे यासाठी पाठबळ मिळावे, नाशिकला आयटी तसेच अॉटोमोबाईल इंडस्ट्री मिळावी अशी अपेक्षा पवार यांच्याकडे व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करताना
तुम्हाला नाशिकला पुन्हा माफी मागायला यावे लागणार नाही, असा आत्मविश्वासही बोलून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *