नाशिक

इच्छुकांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा धुमारे

नाशिक : प्रतिनिधी
न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचेनिर्देश दिल्यानंतर अंतिम प्रभागरचना शनिवारी जाहीर करण्यात आली. तीन सदस्यीय प्रभाग कायम ठेवण्यात आल्यामुळे पूर्वीचीच रचना कायम राहणार आहे. प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे इच्छुकांच्या थंडावलेल्या हालचालींना पुन्हा वेग येण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेची मुदत संपल्यामुळे निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे दिसत असतानाच, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणुका लांबणीवर पडल्या. निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या इच्छुकांमध्ये त्यामुळे काहीसा हिरमोड झाला होता. अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांशी संपर्क अभियान सुरू केले होते. तर काहींनी संपर्क कार्यालये उघडून जनतेचे प्रश्‍न, अडचणी सोेडविण्यासाठी संपर्क कार्यालयातच ठाण मांडले होते. काहींनी निवडणुकीच्या तोंडावर प्रभागामध्ये विकासकामांच्या उद्घाटनाचा आणि भूमिपूजनाचा धडाकाच लावला होता. पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या. परिणामी, आता सहा महिने तरी निवडणुका होत नाही, अशी शक्यता गृहीत धरून इच्छुकांच्या हालचाली थंडावल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज सकाळी गुड मॉर्निंगचे पाठविण्यात येणारे मेसेजही काहींनी बंद करून टाकले. मात्र, आता प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा धुमारे फुटले आहेत.
एका प्रभागात तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे आता मागील इच्छुकांना तयारीसाठी नव्याने वेळ मिळाला आहे. प्रभागरचनेमध्ये फारसे बदल झालेले नसल्याने इच्छुकांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाशी युती अथवा आघाडी होते की स्वबळावर निवडणूक लढविली जाते, यावर इच्छुक डोळा ठेवून आहेत. राज्यात भोंग्यांच्या प्रश्‍नावरून राजकारण तापलेले आहे. त्यातच मध्यंतरी पक्ष प्रवेशाचे सोहळे चांगलेच रंगू लागले होते.  स्वपक्षात राहून निवडून येण्याची शक्यता मावळल्याने अथवा तिकीट मिळण्याची खात्री नसल्याने काहींनी इतर पक्षामध्ये प्रवेश करण्याचे ठरविले होते. तथापि, त्यालाही नंतरच्या काळात ब्रेक बसला होता. आता पुन्हा एकदा नव्याने गणिते मांडली जाणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
Ashvini Pande

Recent Posts

फाउंडेशन आधी की कन्सीलर?

परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ,…

24 seconds ago

नकल आणि चरित्र

सृष्टीवर ज्ञान, विद्या आणि चरित्र हे नकल करून मिळत नाही, ते अर्जित करावं लागतं. साम्राज्य…

7 minutes ago

नाशिकमध्ये धार्मिक स्थळांवरील 138 अनधिकृत भोंग्यांवर कारवाई

आ. देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश नाशिक ः प्रतिनिधी शहरातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत…

17 minutes ago

सिन्नरला अतिक्रमणधारकांना सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अतिक्रमणे होणार निष्कासित, मालमत्ताही करणार जप्त सिन्नर : प्रतिनिधी जागा मिळेल तिथे टपर्‍या, हातगाडे…

1 hour ago

इगतपुरी परिसरात श्रावणात पावसाने पुन्हा धरला जोर

धरणांतून रोखलेला विसर्ग सुरू; ग्रामीण भागात रिपरिप सुरूच इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यात गत महिन्यात…

1 hour ago

स्मार्ट सिटीच्या सिग्नल यंत्रणेचा फज्जा; वाहतुकीला फटका

शहरातील 12 ठिकाणचे सिग्नल बंद; वाहनधारकांचा होतोय गोंधळ नाशिक : प्रतिनिधी शहरातील 60 पैकी 40…

2 hours ago