नाशिक: प्रतिनिधी
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधात चुंबळे गटाने अविश्वास ठराव आणला आहे. बाजार समितीच्या15 संचालकांनी आज जिल्हाधिकारी व सहा निबंधक यांची भेट घेतली. पिंगळे हे बाजार समितीचे काम करीत असताना इतर संचालक मंडळाच्या सदस्यांना विश्वासात घेत नाही. असा आरोप करत15 संचालक यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. शिवाजी चुंबळे यांनी नुकताच भाजपा मध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे भाजपचे पाठबळ मिळाल्याने शिवाजी चुंबळे यांनी अविश्वास आणत पुन्हा एकदा पिंगळे यांच्याविरोधात आघाडी उभी केली आहे, पिंगळे गटाचे 15संचालक आपल्याकडे वळवत हा अविश्वास आणला गेला आहे.