लक्ष्यवेध : प्रभाग-28
निवडणुकीत माजी लोकप्रतिनिधींचा कस लागणार!
नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी रंग घेत असताना प्रभाग क्रमांक 28 मध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. माजी नगरसेवकांच्या कार्यकाळात बुरकुले हॉल ते फडोळ मळा, शुभम पार्क ते फडोळ मळा रस्त्यांचे डांबरीकरण, गणेश कॉलनीतील आरोग्य केंद्र, ओम कॉलनीतील योगा केंद्र, गजानन महाराज मंदिर सभामंडप, तसेच ठिकठिकाणी जलवाहिनींची उभारणी अशी अनेक विकासकामे पूर्ण झाली. सध्या आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतूनही विकासनिधी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील फडोळ मळा ते अंबड गाव जोडणार्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा त्रास वाढत असून, महापालिकेने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तिकीट न मिळालेल्यांच्या बंडखोरीची शक्यताही व्यक्त होत आहे. अशा पार्श्वभूमीवर विकासाच्या ठशावर आणि रस्त्यांच्या खड्ड्यांवर मतदारांची नजर असेल, हे निश्चित!
प्रभाग क्रमांक 28मधील सर्वच राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकाळात बुरकुले हॉल ते फडोळ मळा,शुभम पार्क ते फडोळ मळा रस्ता डांबरीकरण , बंदावणे नगर रस्ता काँक्रीटीकरण ,गणेश कॉलनीत आरोग्य केंद्र, ओम कॉलनीत योगा केंद्र,गजानन महाराज मंदिर सभामंडप, प्रभागात ठिकठिकाणी 12 इंची पाईपलाईन,प्रणय स्टॅम्पिंग ते माऊली लॉन्स रस्ता चौपदरीकरण, विखे पाटील शाळा परिसरात महिला व पुरुषांसाठी जलतरण तलाव, 10 रुपयांत आरोग्य केंद्र,महालक्ष्मी नगर येथे पाण्याची टाकी आदी विकासकामे करण्यात आली आहेत. प्रभागात सध्या आ.सीमा हिरे यांच्या निधीतून रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून प्रभागात निधी आणण्यासाठी माजी नगरसेवक प्रयत्नशील आहेत.
प्रभागात रस्ता प्रश्न गंभीर बनत चालला आहे. फडोळ मळा ते अंबड गावाला जोडणार्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून महापालिकेने या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या प्रभागात भाजप मध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिकीट न मिळालेले उमेदवार दुसर्या पक्षात जाण्याची शक्यता देखील आहे.
विद्यमान नगरसेवक

डी. जी. सूर्यवंशी

दीपक दातीर

प्रतिभा पवार

सुवर्णा मटाले
प्रभागाची व्याप्ती
डी.जी.पी. नगर क्र. 2, वृंदावन नगर, महालक्ष्मी नगर ,मुरारी नगर ,कार्तिकेय नगर ,उपेंद्र नगर, वनश्री कॉलनी, कर्डिले मळा, फडोळ मळा, उपेंद्र नगर, शुभम पार्क, अंबिका नगर, प्रसन्न नगर, बाल मुक्तांगण शाळा,कंफर्ट झोन
सन 2011 नुसार लोकसंख्या
लोकसंख्या :51896
अ. जाती :4488
अ. जमाती :2412
इच्छुक उमेदवार
सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार, डी.जी.सूर्यवंशी, दिपक दातीर, शरद फडोळ,डॉ.वैभव महाले, मनोज आहेर, डॉ. हर्षा मोगल, डॉ. विनय मोगल, वंदना पाटील,सुनील साळवे,दिलीप दातीर,अपर्णा गाजरे,रमेश गाजरे,भूषण भामरे,माधवी सुर्यवंशी,अमोल पाटील, मकरंद वाघ, सीमा वाघ, अविनाश पाटील
प्रभागातील विकासकामे
♦ बुरकुले हॉल ते फडोळ मळा, शुभम पार्क ते फडोळ मळा रस्ता डांबरीकरण.
♦ गणेश कॉलनीत आरोग्य केंद्र.
♦ ओम कॉलनीत योगा केंद्र.
♦ गजानन महाराज मंदिर सभामंडप.
♦ प्रभागात ठिकठिकाणी 12 इंची पाइपलाइन, प्रणव स्टॅम्पिंग ते माउली लॉन्स रस्ता चौपदरीकरण, विखे पाटील शाळा परिसरात महिला व पुरुषांसाठी जलतरण तलाव, दहा रुपयांत आरोग्य केंद्र, महालक्ष्मीनगर येथे पाण्याची टाकी.
या प्रभागात सत्ताधारी भाजपचे एक,शिवसेना उबाठा पक्षाचा एक तर शिवसेना (शिंदे) पक्षाचे दोन माजी नगरसेवक आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीला जोडणारा प्रभाग म्हणून या प्रभागाची ओळख आहे. प्रभागात शिवसेनेचे (शिंदे ) सुवर्णा मटाले, दीपक दातीर,शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी,भाजपच्या प्रतिभा पवार माजी नगरसेवक आहेत.
नागरिक म्हणतात…
सध्या अतिशय कमी दाबाने पाणी येत आहे. अतिशय कमी दाबाने पाणी येत सध्या, जनतेने या नगरसेवकांना दोन वेळा निवडून दिले. जण हिताचे एकही ठोस काम आमच्या प्रभागात नाही. ना तारा भूमिगत झाल्या, ना लहान मुलासाठी एखादा गार्डन झाले आणि जे आहेत त्यांची दुरवस्था झाली आहे. ना विद्यार्थ्यासाठी वाचनालय, ना कुठली व्यायामशाळा, ना कुठे सीसीटीव्ही . नागरिकांनी काही माजी नगरसेवकांना प्रश्न किंवा समस्या मांडल्या कि अरेरावीची उत्तर मिळतात.
– कुणाल मेणे
प्रभागात सध्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने नागरिकांना मणक्याचे त्रास सुरु झाले आहे. शहरात सर्वत्र खड्डे बुजवले जात असतांना प्रभागातील काही भाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. महापालिका अधिकार्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
– सुरेश आव्हाड
प्रशाकीय राजवटीमुळे लोकप्रतिनिधींचे चालेनासे झाले आहे. लवकरात लवकर महापालिका निवडणुका लागून लोकप्रतिनिधी महापालिकेत जाणे गरजेचे आहे जे-ने करून प्रभाग समस्यामुक्त व्हायला मदत होईल
– गणपत माळी
गेल्या तब्बल चार वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने प्रभागात विकास कामे होत नाही. धरणसाठा मुबलक असतांना ऐन दिवाळीत बर्याच ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. – पवन पवार



