आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली
नाशिक : देवयानी सोनार
वाढती लोकसंख्या तितक्याच प्रमाणात किंबहुना त्याहून जास्त प्रमाणात होणारा कचरा हा पर्यावरणास हानिकारक ठरतो आहे. नाशिक महानगरपालिकेने नुकतेच ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. कचरा वेगळा न करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कचर्याचे वाढते प्रमाण पर्यावरणाला धोकादायक आहे, ही ओरड होत असूनही कोणीच कचरा करताना कचरत नाही. त्यामुळे स्वच्छता ही केवळ मोहीम न राहता ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग बनण्याची गरज आहे.
दरवर्षी जागतिक पुनर्वापर दिन 18 मार्च रोजी साजरा केला जातो.कचर्याचा पुनर्वापर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे, ही काळाची गरज बनली आहे. जे निरुपयोगी म्हणून फेकून दिले जाते ते कित्येकदा काही उपयोगाचे ठरू शकते.त्यातून अनेक उपयोगी वस्तू बनविल्या जाऊ शकतात. नाशिकमध्ये अनेक सेवाभावी संस्था काम करतात, ज्या पुनर्वापरासाठी प्रवृत्त करतात किंवा दान केलेल्या वस्तू गरजूंना देतात. अशा सेवाभावी संस्थांपैकीच एक नाशिक प्लॉगर्स संस्था
आहे. प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी नियमितपणे स्वच्छता मोहीम, प्लॉगिंग ड्राइव्ह व जनजागृती उपक्रम आयोजित करत असतो. मात्र, आमचा उद्देश केवळ कचरा उचलणे एवढाच नसून, कचरा निर्माण होण्याआधीच त्याला आळा घालणे आणि पुनर्वापराची सवय समाजात रुजवणे असल्याचे नाशिक प्लॉगर्सचे संस्थापक अध्यक्ष तेजस तळवारे सांगतात.
रिड्यूस, रीयूज, रिसायकल हा पर्यावरण सर्वधनाचा महत्त्वाचा विषय मानला जातो. 7 आर म्हणजे रिथिंक, रिप्यूज, रीड्यूस, रीयूज, रिपेअर, रीपर्पझ व रिसायकल या तत्त्वांचा अर्थ असा की, आपण कोणतीही वस्तू वापरण्यापूर्वी तिची गरज विचारात घ्यावी, अनावश्यक वस्तूंना नकार द्यावा, वापर कमी करावा, शक्य असल्यास पुन्हा वापरावा, दुरुस्त करून आयुष्य वाढवावे, नव्या उपयोगासाठी रूपांतर करावे आणि शेवटी पुनर्प्रक्रिया करावी. खरा पर्यावरणपूरक दृष्टिकोन हा फक्त रिसायकलिंगपर्यंत मर्यादित नसून जबाबदारीने वापर करण्यापासून सुरू होतो. प्रत्येकाने सवयी बदलल्या, कचर्याचे वर्गीकरण केले, वापर कमी केला, वस्तूंचा पुनर्वापर केला व गरजूंना देण्याची सवय लावली तर शहर स्वच्छ, सुंदर पर्यावरणपूरक बनवणे नक्कीच शक्य आहे.
नाशिक प्लॉगर्स लोकांशी थेट संवाद साधून, शाळा-महाविद्यालयांमध्ये सत्रे घेते. सोशल मीडियाद्वारे संदेश पोहोचवून आणि 7 आर म्हणजे म्हणजे रिथिंक, रिप्यूज, रीड्यूस, रीयूज, रीपेअर, रीपर्पझ आणि रिसायकल या संकल्पनेवर आधारित जनजागृती मोहिमा राबवते.
– तेजस तळवारे, संस्थापक अध्यक्ष, नाशिक प्लॉगर्समहानगरपालिका राबवत असलेले 3 (रिड्यूस रिसायकल) तत्त्वांवर आधारित उपक्रम शहर स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि कमी कचरा निर्मिती यामध्ये सक्रिय सहभाग घेण गरजेचे आहे.
– डॉ. आवेश पलोड, घनकचरा विभाग
No one hesitates to litter…
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…
स्थायी सदस्य भारती ताजनपुरेंची मागणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेने यापुढे दहा लाखांच्या आतील कामे…