नाशिक

उगाव रस्त्यासाठी बैठकीत तोडगा नाही Gavkari impact

Gavkari impact

निफाड तालुका : प्रतिनिधी
रेल्वे प्रशासनाने उगाव रेल्वे गेट नंबर 102 लगत केलेल्या कुंपणामुळे शेतकर्‍यांना दळणवळणासाठी येणार्‍या अडचणींसंदर्भात काल निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यावेळी रेल्वे विभागाचे अधिकारी, उगाव ग्रामपालिकेचे सरपंच व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पण या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही.
पर्यायी रस्त्यासाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे दोन तास बैठक होऊनदेखील त्यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या जैसे थे राहिल्या. शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. साहजिकच आपल्या शेतात जाण्यासाठी शेतकर्‍यांना रस्ता हवा आहे. मात्र, रेल्वे लाइन टाकते वेळी या शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा रस्त्यासाठी जमिनी दिल्यास यातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे रस्त्यासाठी जमिनी देण्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्यामुळे यावर प्रशासन आता काय उपाययोजना करणार आणि शेतकरी आपल्या शेतात कसे जाणार याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. यातून प्रशासनातील अधिकार्‍यांनी योग्य मार्ग काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रशासन खडबडून जागे

रेल्वे प्रशासनाने उगाव रेल्वे गेट नंबर 102 लगत कुंपण केल्याने रेल्वे लाइनच्या कडेने असणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने या शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. साहजिकच याबाबत दैनिक ’गांवकरी’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रेल्वे प्रशासनाचे आहेर, मंडळ अधिकारी काळे, उगावचे सरपंच पानगव्हाणे यांच्यासह परिसरातील शेतकर्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान शेतकर्‍यांना रस्ता हवा आहे; परंतु त्यासाठी शेतकरी आपल्या शेतातील रस्त्यासाठी लागणारी जागा सोडावयास तयार नाहीत.

 

No solution in meeting for Ugao road

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago